Shocking : भयंकर! १७ वर्षीय मुलगी बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, पण परत आलीच नाही; २ दिवसांनी असं काही घडलं की सगळेच हादरले

Palghar Crime News : पालघरच्या कासा परिसरात १७ वर्षीय अंजू कडूचा संशयास्पद मृत्यू. कुटुंबीयांनी प्रियकरावर गंभीर आरोप करत घातपाताचा संशय व्यक्त केला असून, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
Palghar Crime News
Palghar Crime News Ai Image
Published On
Summary
  • पालघरच्या कासा परिसरात १७ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

  • प्रियकरासोबत फिरायला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही

  • कुटुंबीयांचा प्रियकरावर गंभीर आरोप

पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. अंजू विष्णू कडू ही तरुणी मागील आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र, दोन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना फोनवरून देण्यात आली. या घटनेनंतर अंजूच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले असून, तिचा मृत्यू घातपातामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अंजू प्रियकरासोबत बाहेर गेल्यानंतर काही काळाने तिची प्रकृती खालावली. मात्र, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिच्या शेजारी अघोरी प्रकार करण्यात वेळ घालवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रकृती गंभीर असताना योग्य उपचार मिळाले असते, तर अंजूचा जीव वाचला असता, असा दावा तिच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

Palghar Crime News
Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

अंजूच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांनी या प्रकरणात संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. तिचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप करत, तिच्या प्रियकरासह या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Palghar Crime News
Ladki Bahin Yojana : ₹1500 की ₹3000? रक्षबांधनाआधी लाडकीच्या खात्यावर हफ्ता जमा, बँक बॅलन्स आताच चेक करा

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनादरम्यान घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन आणि नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानंतर उपलब्ध पुरावे आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणातील तपास अहवाल आणि वैद्यकीय निष्कर्षांकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, अंजूच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा उलगडा पोलिसांच्या तपासातून होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com