Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर

Palghar Accident: पालघरमध्ये दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर
Palghar AccidentSaam Tv
Published On
  • पालघरमध्ये भीषण रस्ते अपघात

  • मोखाड्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक

  • अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी

  • खोडाळा पोलिसांचा अपघाताचा तपास सुरू

फैय्याज शेख, पालघर

पालघरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. मोखाडा तालुक्यातील गोमघर जवळ ही अपघाताची घटना घडली. भरधाव दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघाता इतका भीषण होता ही दोन तरुणांनी जागीच प्राण सोडले. तर ३ तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील गोमघरजवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भयंकर अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीवरून प्रवास करणारे ५ तरुण गंभीर जखमी झाले होते. यातील दोघांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर इतर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर
Accident News : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, अनेकजण जखमी

खोडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील विहीगांव येथील लक्ष्मण अशोक गांगड (वय २८ वर्षे), दिलीप गांगड (वय २९ वर्षे) आणि देवीदास कृष्णा गांगड (वय ३० वर्षे) हे ३ तरूण मोखाडा तालुक्यातील गोमघर मार्गे वाडा तालुक्याच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. तर दुपारी ३ वाजताच्या सुमारास गोमघर येथील बोट्याचीवाडी येथील अनिल यशवंत सवरा हा तरुण आपल्या वडिलांना घेण्यासाठी दुचाकीवरून खोडाळा येथे जात होता.

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

दोन्ही दुचाकी वेगात होत्या. त्याचवेळी या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती ही दुचाकीवरील पाचही तरुण रस्त्यावर दूरवर फेकले गेले. या अपघातामध्ये लक्ष्मण गांगड (राहणार- विहीगाव) आणि अनिल यशवंत सवरा ( राहणार - बोट्याचीवाडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! आंबा घाटात प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कारची धडक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com