Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस धुवाधार पाऊस बरसणार; हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News: राज्यात पुढील ५ दिवस पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
Orange alert declared districts in 5 district of Maharashtra
Orange alert declared districts in 5 district of MaharashtraSaam TV
Published On

Maharashtra Weather News: गेल्या २४ तासांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. याशिवाय काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे.

दरम्यान, पुढील ५ दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती राहणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. राज्यात पुढील ५ दिवस पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Orange alert declared districts in 5 district of Maharashtra
Maharashtra Landslide: महाराष्ट्रासाठी जुलै महिना ठरतोय काळरात्र; आधी माळीण, नंतर तळीये; आता इर्शाळवाडी डोंगराखाली

हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना देण्यात आलेला ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवला आहे. यासोबत पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांनाही ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तरेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार पाऊस पडत आहे. पुढील पाचही दिवस मराठवाडा विभाग वगळता तीन विभागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Orange alert declared districts in 5 district of Maharashtra
Irshalwadi Landslide: आम्ही शाळेत होतो, म्हणून वाचलो; आई-बाबांना पळताही आलं नाही; घटनाक्रम सांगताना मुलाला हुंदका अनावर

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१, २२ आणि २३ जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या मुंबई परिसर आणि कोकणातील अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली असली तरी या तुफान पावसाने महाराष्ट्राची यंदाची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर छोट्या धरणांचे दरवाजे उघडावे लागणार असून लवकरच हा सगळा प्रचंड पाणीसाठी मोठ्या धरणांमध्ये जाईल.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com