महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी ठरला. कारण, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत संपूर्ण गाव उध्वस्त झालं असून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अजूनही शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकून आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. निसर्गाच्या कोपाने संपूर्ण गाव इर्शाळवाडी उध्वस्त झालं असून या ठिकाणी अनेक कुटुंब त्यांच्या आप्तस्वकियांना शेवटचं एक नजर भरून बघता येईल, या आशेत वाट बघत बसली आहेत.
तर बचाव कार्यासाठी निघालेले जवान मलब्याखाली दबलेल्या लोकांच्या शोधात आहेत. जुलै महिना हा महाराष्ट्रासाठी काळरात्र ठरल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. या संपूर्ण महिन्यात देशाला हादरवून सोडणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आधी माळीण, त्यानंतर तळीये आणि आता इर्शाळवाडी दुर्घटनेने शेकडो लोकांचा जीव गेला आहे.
३० जुलै २०१४ रोजी आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर (Maharashtra Landslide) कोसळलेल्या दरडीच्या बातमीने संपूर्ण देशच हादरला. धो-धो कोसळणारा पाऊस थांबण्याची वाट बघत बसणारे गाव कधी डोंगरावरून आलेल्या चिखलाखाली गाडले गेले हे कळले सुद्धा नाही.
माळीण हे घाटाच्या पश्चिम सीमेजवळ असल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. माळीण गावात पर्जन्यमापकाची सोय नाही. त्यामुळे आसपासच्या पर्जन्यमापन केंद्रांवरून तेथील पावसाचा अंदाज बांधावा लागत असे.
३० जुलै २०१४ ला डिंभे धरणाच्या पर्जन्यमापकात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. साडेचारला त्याचे प्रमाण एकाएकी वाढून १०३ मिलीमीटर झाले. आणि संपूर्ण गाव डोंगरावरून कोसळणाऱ्या आक्रमक चिखलाखाली गाडले गेले.
२२ जुलैला २०२१ साली महाडच्या तळीये गावात अशाच प्रकारची दुर्घटना घडली. दुपारी १२ च्या सुमारास पहिल्यांदा डोंगराचा काही भाग खचला. डोंगर खचला म्हणून काही तरुणांनी त्याचे अक्षरश: व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केले.
पण कोणास ठाऊक होते की हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा व्हिडिओ ठरेल. डोंगराचा काही भाग कोसळला तेव्हा गावकऱ्यांना या काहीतरी मोठं घडेल याची चुणूक लागली असावी. काही शेलारांनी आणि कुटुंबियांनी त्यांची वस्ती खालच्या बासरवाडी पठारावर हलवली. अनेकांना शेलारांनी गाव सोडण्याचीही विनंती केली.
दुपारच्या ४ वाजताच्या सुमारास संपूर्ण वाडी मागचा अक्खा डोंगर गावकऱ्यांवर कोसळा. या घटनेत ८१ मृत्यू झाल्याचे कळले होते, तर ५५ मृत्यू शोधण्यात यंत्रणेला यश मिळाले होते. वरील तिन्ही घटना जुलै महिन्यातच घडल्या आहेत. त्यामुळे जुलै महिना महाराष्ट्रासाठी काळरात्र बनत आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.