Raigad Landslide News Today: आमची लेकरं कुठे गेली हो.., मुलांना शोधण्यासाठी आई-वडिलांची धावाधाव; इर्शाळवाडीत आक्रोश

Raigad Khalapur Irshalgad Landslide News: कुणाची मुलगी, कुणाचा भाऊ या मलब्याखाली अडकले आहेत. जीवाचा आकांत करुन लोक त्यांच्या नातेवाईकांना शोधत आहेत.
Raigad Khalapur Irshalwadi Landslide
Raigad Khalapur Irshalwadi LandslideSaam TV
Published On

Raigad Khalapur irshalwadi Landslide News: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. इर्शाळवाडी गावावर (Raigad News)  दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत २० ते २५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

Raigad Khalapur Irshalwadi Landslide
Irshalwadi Landslide: मी घरात बसलेली, अचानक जोरात आवाज झाला; बाहेर बघितलं तर... महिलेने सांगितला धडकी भरवणारा प्रसंग

पाऊस सुरू असल्याने बचावकार्याला अडथळा येत आहे. घटनास्थळी सध्या अतिशय शोकाकूल वातावरण आहे. हे गाव दरडीखाली दबलं गेल्याने शेजारच्या गावातील लोक आपल्या नातेवाईकांच्या काळजीपोटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथामिक माहितीनुसार, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या १०० नागरिकांमध्ये १५ ते २० लहान मुलांचा समावेश आहे.

कुणाची मुलगी, कुणाचा भाऊ मातीच्या ढिगाऱ्याखाली (Landslide) अडकले आहेत. जीवाचा आकांत करुन लोक त्यांच्या नातेवाईकांना शोधत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदलापूरहून एक व्यक्ती इर्शाळवाडीत दाखल झाली आहे. त्यांची मुलगी या गावात राहते. तिच्या काळजी पोटी ते इर्शाळवाडीत पोहोचले आहेत.

Raigad Khalapur Irshalwadi Landslide
Raigad Landslide: इर्शाळवाडीवर दरड कोसळली, सोन्यासारखं गाव एका क्षणात उध्वस्त; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS

आपल्या कुटुंबियांच्या काळजीनं अनेकजण कासावीस झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांकडे हे लोक सातत्यानं आपल्या आप्टेष्टांबाबत विचारणा करत आहेत. आमचे नातेवाईक कुठे आहेत? ते कसे आहेत? त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला वरती जाऊ द्या, अशी विवंचना वारंवार पोलिसांकडे करत आहेत.

एका महिलेने आपली लेकरं या घटनेत दबली असल्याचं सांगितलं आहे. आमच्या कुटुंबातील ७ जण बेपत्ता असल्याचं या महिलेनं सांगितलं आहे. घटनास्थळापासून ३-४ किमी अंतरावर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. कोणत्याही वाहनाला आत सोडलं जात नाही. गर्दी होत असल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. जवळपास ४० रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात असून त्यातील निम्म्या आत सोडल्या आहेत, तर बाकीच्या बाहेरच आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com