रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे मोठी दुर्घटना घडली.
एका वसाहतीवर दरड कोसळून रात्रीच्या झोपेतच अनेक जणांवर काळाने घाला घातला.
दरड दुर्घटनेत १२० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
आतापर्यंत ५ ते ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर २७ जणांची सुटका करण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार ही ६५ घरांची वस्ती असून त्यातील जवळपास २५ ते ३० घरांवर दरड कोसळली असून जमीन उद्ध्वस्त झाली आहे.
एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.
दुर्दैवाने सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.