ओटीपी दिला आणि ओला कार लहान बहिणीला घेऊन निघाली अन् पुढं काय घडलं?

Ola Cab Otp Confusion Case In Kalyan: कल्याणमध्ये ओला कॅब बुकिंगदरम्यान चुकीचा ओटीपी दिल्याने ११ वर्षांची मुलगी चुकीच्या गाडीत गेली. दीड तासाच्या गोंधळानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलीला सुखरूप परत आणले.
Kalyan police reunite 11-year-old girl with her family after Ola OTP confusion triggers panic.
Kalyan police reunite 11-year-old girl with her family after Ola OTP confusion triggers panic.Saam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: ओला चालकाला ओटीपी दिला. कार रवाना झाली. त्या गाडीत ११ वर्षाची मुलगी असल्याने ओला चालक फोन न उचलल्याने जवळपास गोंधळाची परिस्थिती उद्धवली होती अखेर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी त्वरीत कारवाई करीत हा सगळा संभ्रम संपविला. आप्लया लहान बहिणाला सुखरुप येताना पाहून तिच्या बहिणीच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले.

Kalyan police reunite 11-year-old girl with her family after Ola OTP confusion triggers panic.
Accident CCTV : हवेत उडाला आणि वरचेवर गर्रकन फिरला; तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

दोन सख्या बहिणी आईला भेटण्यासाठी ठाण्याला निघाल्या. दोन ओला कार बुक करण्यात आल्या. एक ओला कार आली. त्यात काही वस्तू आणि ११ वर्षाचा बहिणीला बसवून त्या ओला चालकाला ओटीपी नंबर दिला. त्याच दरम्यान दुसरी ओला कार आली. त्या कारमध्ये सामान टाकले गेले. याच वेळी पहिली ओला कार निघून गेली. महिला घाबरली. कारण की आेला चालक फोनच उलचत नव्हता. महिलेने भर चौकात रडण्यास सुरुवात केली. ११२ नंबर या हेल्पलाईनवर कॉल केल्यावर महात्मा फुले पाेलिस बेतूरकर पाडा चौकात हजर झाले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक बालकृष्ण परदेशी यांनी चाैकशी सुरु केली.

Kalyan police reunite 11-year-old girl with her family after Ola OTP confusion triggers panic.
पुण्यातील भोंदू बाबाला बेदम चोप, खेडच्या महिलेची केली होती फसवणूक, व्हिडिओ आला समोर

कार चालक पोलिसाचा देखील फोन उचलत नव्हता. पोलिसाचा संशय वाढला. थोड्याच वेळात कार चालकाचा फोन आला. मी कळव्या पर्यंत पोहचलो आहे. वरिष्ठ पाेलिस निरिक्षक परदेशी यांनी चालकाला विचारले की, कारमध्ये बसलेली मुलगी कुटे आहे. त्यावेळी कार चालकाने ती मुलगी सोबत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्वरीत ओला चालकाला गाडी पुन्हा मागे फिरव. जिथून त्या मुलीला कारमध्ये बसविले त्याच ठिकाणी घेऊन ये. जवळपास १ तासानंतर ती कार परत आली.

Kalyan police reunite 11-year-old girl with her family after Ola OTP confusion triggers panic.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

कार येताच त्या कारमध्ये आपली लहान बहिण आस्था वर्माला पाहून मोठी उज्ज्वला माणिक हिच्या डोळ्यात आनंदअश्रू आले. तिच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. हा सर्व घोळ ओटीपी दिल्यानंतर झाला . दुसरा ओला चालक फोन उचलत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com