Akshay Shinde Encounter : आता एकालाही सोडणार नाही, बंदूक रोखत अक्षयची धमकी, संजय शिंदेंनी सांगितला व्हॅनमधील थरार

Badlapur Encounter : अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर होण्याआधी त्याला ठाण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं होतं? याची माहिती संजय शिंदे यांनी दिली आहे.
आता एकालाही सोडणार नाही, बंदूक रोखत अक्षयची धमकी, संजय शिंदेंनी सांगितला व्हॅनमधील थरार
Akshay Shinde EncounterSaam Tv
Published On

मुंब्रा येथे सोमवारी अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता. त्याचा सोमवारी एन्काऊंटर झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदे यानं पोलिसावर तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे.

अक्षय शिंदे याच्या गोळीबारात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले होते. संजय शिंदे यांनी स्वत:च्या बचावासाठी अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या संजय शिंदेंच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेय. मुंब्रा रोड येथे सोमवारी ४५ मिनिटं झालेल्या थरारचा उलगडा संजय शिंदे यांनी केलाय.

आता एकालाही सोडणार नाही, बंदूक रोखत अक्षयची धमकी, संजय शिंदेंनी सांगितला व्हॅनमधील थरार
Akshay Shinde: अक्षय शिंदेची आत्महत्या नाही एन्काऊंटर, सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांचा गोळीबार; नेमकं काय घडलं? वाचा...

काय म्हणाले संजय शिंदे?

या घटनेबद्दल माहिती देताना पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात संजय शिंदे यांनी सांगितलं की, ''सोमवारी आम्ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अक्षयला सायंकाळी ५.३० वाजता ताब्यात घेतले. यानंतर त्याला घेऊन आम्ही ठाण्याच्या दिशेने निघालो. पुढे आम्ही वाहनात बसलेलो असताना अक्षय शिंदे म्हणाला की, मला जाऊ द्या, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ सुरु केली. यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्याशी अक्षयची झटापट झाली. याच झटापटीत त्याने बंदूक हिसकावून एक गोळी फायर केली. ज्यात निलेश मोरे जखमी झाले.''

'एकालाही जिवंत सोडणार'

''त्यानंतर अक्षय शिंदेने बंदूक दाखवत एकालाही जिवंत सोडणार नाही, असे म्हणत दोन गोळ्या झाडल्या. नशिबाने त्या दोन्ही गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत, म्हणून आम्ही वाचलो. हे सगळं होण्याआधी अक्षयवर गोळी झाडणारे संजय शिंदे पोलीस व्हॅनमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते'', असं संजय शिंदे यांनी सांगितलं.

आता एकालाही सोडणार नाही, बंदूक रोखत अक्षयची धमकी, संजय शिंदेंनी सांगितला व्हॅनमधील थरार
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात नक्की काय घडलं? पोलिसांनी सांगितला तळोजा ते मुंब्रा बायपास दरम्यानचा थरार

संजय शिंदे म्हणाले की, ''निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदे यांच्यात वाद होत असताना मोरे यांनी संजय शिंदे यांना फोन केला आणि घडत असलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संजय शिंदे समोरून उतरून मागच्या पोलीस व्हॅनच्या भागात आले आणि आरोपी अक्षय शिंदेच्या समोर बसले. आरोपी अक्षय शिंदे एपीआय निलेश मोरे आणि कॉन्स्टेबल अभिजीत मोरे यांच्यामध्ये बसला होता. पीआय संजय शिंदे हे आरोपीच्या समोर कॉन्स्टेबल हरीश तावडे यांच्यासमोर बसले होते.''

संजय शिंदे पुढे म्हणाले की, ''आरोपी अक्षय शिंदे अचानक आक्रमक होऊन एपीआय मोरे बंदूक खेचू लागला, त्यावेळी ती फायर झाली. ज्यात मोरे जखमी झाले आणि खाली पडले. त्यानंतर अक्षय शिंदे याने पिस्तूलचा ताबा घेतला आणि दोन राउंड फायर केले, जे सुदैवाने कोणालाही लागले नाहीत. अक्षय शिंदे आणखी गोळ्या झाडण्याच्या तयारीत असताना संजय शिंदे यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून एक गोळी अक्षय शिंदेवर झाडली. ज्यात शिंदे जखमी होऊन खाली पडला.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com