देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील काही गोपनीय विषयतज्ञांनी ही प्रश्नपत्रिका बाहेर लीक केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. हा संपूर्ण प्रकार अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या एका सुनियोजित गुन्हेगारी कटाचा भाग असल्याचे CBI ने स्पष्ट केले आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी एक संपूर्ण सप्लाय चेन कार्यरत होती. NTA मधील संबंधित विषयतज्ज्ञांनी गोपनीयतेचा भंग करत प्रश्नपत्रिका बाहेर काढल्या.
त्यानंतर या प्रश्नपत्रिका मध्यस्थ आणि कोचिंग क्लासेसच्या ऑपरेटरपर्यंत पोहोचवण्यात आल्या. तेथून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची मोठी रक्कम वसूल करून त्यांना या प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्याचा कट तपासात उघड झाला आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी परीक्षा साहित्याचा आणि पदाचा गैरवापर करण्यात आला.
या हाय प्रोफाइल प्रकरणात CBI ने 13 जणांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये NTA च्या तीन मुख्य विषयतज्ञांचा समावेश आहे.
मनीषा मांढरे (जीवशास्त्र / Biology तज्ञ)
प्रल्हाद कुलकर्णी (भौतिकशास्त्र / Physics तज्ञ)
मनीषा हवालदार (रसायनशास्त्र / Chemistry तज्ञ)
या आरोपींनी आपल्या पदाचा आणि गोपनीयतेचा गैरवापर करून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे. सध्या या प्रकरणातील पुढील आर्थिक धागेदोरे आणि रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर मध्यस्थांचा अधिक तपास सुरू आहे. एप्रिल 2026 मध्ये या लोकांनी पेपर फोडण्याच्या ऐवजी त्यामधील प्रश्न आणि काही मजकूर काढला. कुलकर्णी आणि मांढरे यांनी आपल्या पुण्यातील निवासस्थानी विद्यार्थ्यांसाठी शिकवणी आयोजित केली. त्यामध्ये आम्ही सराव परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. याच शिकवणीत तोंडी प्रश्न सांगायचे आणि विद्यार्थी ते आपल्या वहीत लिहून घ्यायचे, असे खळबळजनक खुलासे या चार्जशीटमधून समोर आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.