

सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय
अर्ज भरण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता
मेळाव्यात सुनेत्रा पवार अजितदादांच्या आठवणींनी भावुक
बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याआधी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांच्या कार्यशैलीविषयी आठवण करून दिली. 'अजितदादांची जागा कोणी घेऊ शकणार नाही, परंतु त्यांचा विकास पुढे घेऊन जाणार आहे. अजितदादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. एकही कार्यकर्त्यांला वाऱ्यावर सोडणार नाही, असं म्हणत सुनेत्रा पवारांना पुढील अॅक्शन प्लान सांगितला.
सुनेत्रा पवारांच्या भाषणातील मुद्दे
आपण २ महिन्यांपूर्वी लाडक्या नेत्याला गमावलं. मी बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. अजितदादा आज नाहीत हे मला आजही मान्य नाही, पण नियतीने हा काळ आणला. दादांच्या जाण्याने देशाची हानी झाली. दादांसाठी बारामती आईसारखी, बारामतीकर हा दादांसाठी पांडुरंग. दादांसाठी बारामती श्वास होता. मी माझं दुःख तळघरात कोंडून मी बाहेर पडले. बारामतीकर हीच माझी शक्ती आहे.
अजितदादांच्या माघारी ही पहिली निवडणूक आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी ही बारामतीकर यांना संधी आहे. शरद पवार साहेब यांनी दृष्टिकोन दिला. त्यात अजितदादा यांनी रंग टाकला. अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांचा विकास पुढे घेऊन जाणार आहे. अजितदादांचा एक ही शब्द खाली पाडू देणार नाही. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. अनेकांचे मनोबल खचले, पण एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहणार आहे.
मी उर्वरित आयुष्य काम करत राहील. मी शरद पवारांची सून आणि दादांची पत्नी आहे. मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते. महायुती आणि मित्र पक्षातील सगळ्यांचे आभार मानते.बारामती माझ्यासाठी मतदारसंघ नाही, पण माझी ओळख आहे. अजितदादांनी पेरलेले विकासाचे झाड आपण वाढवायचे आहे. निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे. बारामतीकर त्या निवडणुकीत काय करायचं हे ठरवलं आहे. अजितदादांना जी साथ दिली, त्यापेक्षा जास्त साथ द्याल अशी मला अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.