ती जाणीव मनाला कायम टोचत राहते; अजितदादांच्या निधनाला २ महिने झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची इमोशनल पोस्ट

sunetra pawar on ajit pawar : अजितदादांच्या निधनाला २ महिने पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
sunetra pawar news
sunetra pawar Saam tv
Published On
Summary

अजितदादांच्या निधनाला दोन महिने पूर्ण

अजित पवारांना महाराष्ट्रभरातून श्रद्धांजली अर्पण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट

दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज शनिवारी दोन महिने पूर्ण झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रभरातून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली जात आहेत. तसेच त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अजितदादांच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अजितदादांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. 'तुमच्या अनुपस्थितीत झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. ती जाणीव मनाला कायम टोचत राहते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

सुनेत्रा पवार यांची पोस्ट जशीच्या तशी

दादा,

आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.

तुमच्यातील लोकाभिमुख - विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.

sunetra pawar news
भोंदूबाबाच्या विकृतीचा पॅटर्न, कवडीमोल चिंचोके, लाखोंना विकले, नकली साप आणि वाघानं गंडवलं

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते.

तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते.

sunetra pawar news
Ashok Kharat : 'झुंबरची लाइट बंद म्हणजे...'; अत्याचार करण्यासाठी अशोक खरात वापरायचा कोडवर्ड, खळबळजनक माहिती समोर

दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com