Maharashtra Political News: मोठी बातमी! शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस

Maharashtra Political News: राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar News SAAM TV
Published On: 

सुनील काळे

Maharashtra Political News:

राज्यातील राजकारणातून मोठं वृत्त हाती आलं आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार गटाच्या आमदारांनी पक्षविरोधी कृती केल्यामुळे त्यांना अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. त्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. विधीमंडळाच्या नोटिशीला शरद पवार गटाकडून लवकरच उत्तर दाखल केलं जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar News
Uddav Thackeray News: 'गद्दारीचा शिक्का सात पिढ्या जाणार नाही...' उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका; मोदींवरही साधला निशाणा

विधीमंडळाने आतापर्यंत शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस धाडली आहे. विधीमंडळाने जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस बजावली आहे.

त्याचबरोबर विधीमंडळाने शरद पवार गटातील अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना मात्र नोटीस बजावलेली नाही. तर नवाब मलिक यांच्याकडून तटस्थ राहणं पसंत केल्याने त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली नाही.

'या' आमदारांना बजावली नोटीस

१) अनिल देशमुख

२)) राजेश टोपे

३) सुनिल भुसारा

४) प्राजक्त तनपुरे

५) रोहित पवार

६) सुमन पाटील

७) बालासाहेब पाटील

८) संदीप क्षिरसागर

Sharad Pawar News
Beed Political News: बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; माजी मंत्र्याची कार फोडली

अजित पवार गटाच्या आमदारांनाही नोटीस

दरम्यान, अजित पवार गटाच्याही ३० आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांकडून ही नोटीस अजित पवार गटाच्या ३० आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला ८ दिवसात उत्तर द्यायला सांगितलं आहे. एकंदरित शरद पवार आणि अजित पवार गटाने दोन्ही गटाच्या परस्परविरोधी याचिका विधीमंडळात दाखल केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com