Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंगळवारी (6 डिसेंबर) महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ला झाला. यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. एकीकडे शिवसेना खासदार यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत सरकारवर कडक शब्दात निशाणा साधला आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)
पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. इतकंच नाही तर, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू…करू… केंद्राशी बोलू…ही मुळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही', अशी टीका देखील रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर केली.
काय म्हणाले आमदार रोहित पवार?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील वाढत्या वादावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे. “वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही?, पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics News)
"संजय राऊत यांनी हाताच्या बाह्या सावरून मोठ्यांनी बोलणं बंद करावं, तुमच्या बोलण्याची पद्धत महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. मी त्यांना शिंदे साहेबांचा एक सैनिक म्हणून सांगतोय की त्यांनी आपलं तोंड आवरावं, तुम्ही आताच साडेतीन महिन्यांचा आराम करून आलात, तुम्हाला परत आराम करण्याची वेळ येऊ नये", असं म्हणत शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई यांनी संजय राऊतांना चांगलंच खडसावलं आहे. ते मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.