Sanjay Raut vs Eknath Shinde : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून शिंदे सरकारला लक्ष केलं आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. तुम्ही तर स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? मग दाखवा ना आता कर्नाटकाला भाईगिरी, कसले भाई तुम्ही, असं म्हणत संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चॅलेंज केलं आहे. (Maharashtra Politics News)
'तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला एक मिनिटही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, आज महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न अचानक उफाळला आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. ताबडतोब सरकारनं बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा, अन्यथा महाराष्ट्राला कठोर पाऊलं उचलावी लागतील, मग तुमचं सरकार खड्ड्यात गेलं तरी चालेल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ले करण्यात आले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारसह (Eknath Shinde) केंद्राला लक्ष केलं.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला जाताहेत. पण काय उपयोग आहे? महाराष्ट्रात काय चाललंय हे त्यांना कळत नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत, म्हणून शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं. अशी वेळ महाराष्ट्रावर कधी आली नाही, असा आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे.
महाराष्ट्राने गेल्या ५५ वर्षांत इतके हतबल मुख्यमंत्री, इतकं लाचार सरकार पाहिलेलं नाही. काल दोन मंत्र्यांनी (चंद्रकांत पाटील, शंभुराजे देसाई) शेपूट घातलं. ते बेळगावमध्ये जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात? डरपोक सरकार', अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.