CM शिंदेंच्या फोननंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट; सीमावादावर केलं मोठं भाष्य

दोन्ही राज्यांतील वाढता तणाव बघता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute
Maharashtra Karnataka Border DisputeSaam TV

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. एकीकडे महाराष्ट्रातील काही वाहनांवर कर्नाटकात हल्ले करण्यात आले असताना, दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात कर्नाटकातील बसेसना काळं फासण्यात आलं आहे. दरम्यान, दोन्ही राज्यांतील वाढता तणाव बघता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे.  (Maharashtra-Karnataka Border Dispute)

Maharashtra Karnataka Border Dispute
Pune News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला, मनसेने पुण्यात कर्नाटकच्या बसला काळं फासलं

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मात्र, आपण भूमिकेवर ठाम असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच त्याबद्दल कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली जाईल, असंही बसवराज बोम्मई यांनी सांगितलं.

याआधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. महाराष्ट्रातील बसेसला कर्नाटकात जाणीवपूर्व लक्ष केलं जातंय, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. दुसरीकडे विरोधकांनी यावर आक्रमक भूमिका घेतली. सीमाप्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला आहे.  (Latest Marathi News)

विशेष म्हणजे ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना ४८ तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नसल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, दोन्ही राज्यांमधील वाढता वाद पाहता, मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या चर्चेतनंतर बोम्मई यांनी तत्काळ ट्विट केलं. दोन्ही राज्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आणि कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू राहील, असं बोम्मई यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com