Maharashtra Politics: सुनेत्रा पवार, पार्थ पवारांना वगळून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; नेमकं कारण काय?

Delhi political meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
NCP delegation
NCP delegationsaam tv
Published On: 

भरत मोहोळकर, प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना वगळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीला सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना या भेटीपासून दूर ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे आणि यामागे काही राजकीय घडामोडी घडणार आहेत का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. या निकालानंतर पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे पक्षात अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

NCP delegation
Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राजीनामा; 'या' पक्षात केला प्रवेश

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रमुख नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार उपस्थित या दोघांच्या अनुपस्थितीत झालेल्या भेटीचा फोटो समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय राजकीय गणित आहे? राष्ट्रवादीत काही मोठे बदल होणार आहेत का? की राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी आहे? अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे.

भेटीमध्ये काय झाली चर्चा?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नयेत आणि अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात यावे, या दोन प्रमुख मागण्यांवर अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या भेटीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनाला नऊ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अर्थखात्याबाबत भाजपने दिलेला शब्द अद्याप पाळलेला नाही. कदाचित याच मुद्द्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली असावी, असं मिटकरी म्हणाले. या भेटीची माहिती सुनेत्राताई पवार यांनाही असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसंच, भाजपने अर्थखात्याच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, असं आवाहनही मिटकरी यांनी केलं. अन्यथा, विधानपरिषद निवडणुकीनंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये ज्या प्रकारे संघर्ष पाहायला मिळाला, तसाच संघर्ष भविष्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्येही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे असा कोणताही संघर्ष होऊ नये, यासाठी भाजपने अर्थखात्याच्या प्रश्नावर वेळीच तोडगा काढावा, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.