''मला या निकालाचे आश्चर्य वाटले नाही, कारण कॉपी-पेस्ट काम चाललेले आहे. शिवसेनेचा निकाल जो आला, त्यानंतर फक्त त्याचे नाव बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकलेले आहे'', असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालावर आपली प्रतिक्रिया देताना त्या असं म्हणाल्या आहेत.
त्या म्हणाल्या की, ''राहुल नार्वेकर हे वकील आहेत. त्यांना त्यांचे अंतर्मन सांगत असेल, परंतु महाशक्तीच्या दबावापुढे ते काही करू शकत नाहीत. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून हे पक्ष स्थापन केले आहेत. पण थेट पक्ष ओरबाडून इतरांच्या हातात देण्याचे काम असविधानिक पद्धतीने झालेले आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''हे पाप आणि षडयंत्र अदृश्य शक्तीने केले. ही अदृश्य शक्ती देशात आज काहीही करते. आम्ही पूर्ण ताकदीने या विरोधात लढू आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल.'' (Latest Marathi News)
त्या म्हणाल्या, ''देशातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष भाजप आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉल बोर्ड संदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. देशांमध्ये सर्वात मोठा घोटाळा हा इलेक्ट्रॉल बॉण्ड आणि पेटीएमचा झालेला आहे. जर नोटाबंदी झाली तर त्यानंतरच्या तपासण्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटा कशा सापडतात, याचे उत्तर अजूनही सरकारी यंत्रणा देत नाहीत. याचा अर्थ असा आहे की, सर्वात मोठा देशातील घोटाळा तर पेटीएम आणि इलेक्ट्रॉल बोंडमध्ये झालेला आहे.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, ''केंद्र सरकारने अतिशय चुकीचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे पेटीएम हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा एकाच अकाउंट वरून झालेला आहे. 27 हजार कोटी रुपयांचा पेटीएम घोटाळा झालेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.