Rahul Narwekar: 'ठाकरे, राऊत, आव्हाड घटनातज्ज्ञ', निकालावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कडाडले...

NCP MLA Disqualification Case Result: ''सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ऑर्डर दिली आहे. अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत, त्या आधारावर निर्णय दिला आहे'', असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
Rahul Narwekar criticized Aaditya Thackeray, Sanjay Raut and Jitendra Awad
Rahul Narwekar criticized Aaditya Thackeray, Sanjay Raut and Jitendra Awad Saam Tv
Published On

>> गिरीश कांबळे

NCP MLA Disqualification Verdict:

''सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत ऑर्डर दिली आहे. अपात्रतेच्या संदर्भात जे नियम आहेत, त्या आधारावर निर्णय दिला आहे'', असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना टोलाही लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, ''ठाकरे, राऊत, आव्हाड हे घटनातज्ज्ञ आहेत. हे विद्वान आहेत, त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rahul Narwekar criticized Aaditya Thackeray, Sanjay Raut and Jitendra Awad
NCP MLA Disqualification Verdict : 'खरी राष्ट्रवादी अजित पवार यांचीच', निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांचा शरद पवारांना धक्का

ते म्हणाले, ''ज्यांना शेड्युल 10 माहीत नाही, ते असेच वक्तव्य करणार. त्यांनी मेरिटवर बोलायला हवं, ते मेरिटवर बोलणार नाही. डिसेंट आणि डिफेक्शनचा अर्थ त्यांना विचारावा. निकालात शेड्युल 10 चा पूर्ण वापर करण्यात आलाय. ज्यांना माहिती नाही, त्यावर मी स्पष्टीकरण देणार नाही.''  (Latest Marathi News)

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निकाल आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी नार्वेकर यांना लक्ष्य करत म्हटलं होतं की, कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि सोयीनुसार निकाल कसा द्यावा, याबाबत क्लास विधानसभा अध्यक्ष नार्वेकर देऊ शकतात.

Rahul Narwekar criticized Aaditya Thackeray, Sanjay Raut and Jitendra Awad
Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांना ईडीने पाठवले समन्स, नेमकं काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचा हा निकाल अपेक्षित होता : आदित्य ठाकरे

यावरच आपली प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ''राष्ट्रवादीचा हा निकाल अपेक्षित होता. शिवसेनेबाबत जो घोळ झाला किंवा घोळ केल्या गेला, तसाच घोळ राष्ट्रवादीबाबत केला गेला आहे. अध्यक्ष पक्षपात करू शकतात हे धक्कादायक आहे. आपल्या देशात लोकशाही नाही, हे जगाला सांगायला आता काही हरकत नाही. महाराष्ट्राची जशी लूट केली जात आहे, तसे पक्ष पण लुटले जात आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com