NCP MLA Disqualification Verdict : 'खरी राष्ट्रवादी अजित पवार यांचीच', निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्षांचा शरद पवारांना धक्का

NCP MLA Disqualification Case Result: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणाच्या सुनावणीच्या निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे
NCP MLA Disqualification Verdict
NCP MLA Disqualification VerdictSaam Tv
Published On

>> सुरज मसुरकर

NCP MLA Disqualification Case Result:

गेल्या अनेक महिनात्यांपासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणाच्या सुनावणीच्या निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. आपल्या निकालात त्यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. याप्रकरणी निकालाचे वाचन करताना नार्वेकर यांनी खरी राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच असल्याचं म्हटलं आहे.

निकालाचे वाचन करताना राहुल नार्वेकर म्हणाले आहेत की, ''विधिमंडळ बहुमतावर खरा पक्ष कोणाचा? हे ठरवता येऊ शकत नाही. प्रत्येक गटाचं बहुमत महत्त्वाचं आहे. अजित पवारांना 41 आमदारांचा पाठिंबा होता. शरद पवार गटाने 41 आमदारांविरोधात अपात्र याचिका दाखल केली होती. यातच अजित पवार यांना अधिक पाठिंबा होता. विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष (खरी राष्ट्रवादी) आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NCP MLA Disqualification Verdict
NCP MLA Disqualification Verdict: अजित पवार यांचे सर्व आमदार पात्र; शरद पवार गटालाही दिलासा,निकाल नेमका कोणाच्या बाजुने लागला?

याआधी निकाल देताना राहुल नार्वेकर म्हणाले, एकूण शरद पवार गटाकडून 7 आणि अजित पवार गटाकडून 2 याचिका दाखल करण्यात आल्या. कोणता पक्ष खरा, हा मुद्दा दोन्ही पक्षांबद्दल सारखा आहे. ते म्हणाले, दोन्ही गटाने घटनेवर विश्वास दर्शवला आहे.   (Latest Marathi News)

नार्वेकर म्हणाले, 30 जून नुसार अजित पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. असं असलं तरी अजित पवारांची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही. 29 जूनपर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्ष पदाला आक्षेप घेतला नव्हता. 30 जून रोजी शरद पवार आणि अजित पवार या दोघांकडून आपण पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. दोन्ही गटाने राष्ट्रवादी घटनेनुसार अध्यक्ष निवडले गेले आहेत, असा दावा केला आहे.

NCP MLA Disqualification Verdict
Farmers Bharat Bandh: शेतकऱ्यांचा भारत बंद! काय सुरू राहणार, काय बंद होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

ते म्हणाले, शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र विधीमंडळ गटाचे पाठबळ पाहता अजित पवार गट हाच राजकीय पक्ष (खरी राष्ट्रवादी) असल्याचा निकाल त्यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com