Ajit Pawar : 'मुख्यमंत्रिपदा'वर अजित पवारांचा हात, कार्यकर्त्यांची इच्छा दादांनी झाकली; नेमकं काय घडलं? VIDEO

Ajit Pawar Latest News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीमधून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र या सगळ्या राजकीय धुराळ्यात कार्यकर्त्यांनी दादांना भेट दिलेल्या एका पाटीनं लक्ष वेधून घेतलं. पाहूया एक रिपोर्ट...
 'मुख्यमंत्रिपदा'वर दादांचा हात, कार्यकर्त्यांची इच्छा दादांनी झाकली; नेमकं काय घडलं? VIDEO
Ajit PawarSaam tv
Published On

मुंबई : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचं राजकारण कमालीचं तापलंय. सर्वत्र उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु आहे. लोकसभेनंतर विधानसभेलाही संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. कारण अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीमधून भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र या सगळ्या राजकीय धुराळ्यात कार्यकर्त्यांनी दादांना भेट दिलेल्या एका पाटीनं लक्ष वेधून घेतलं.

अजित आशाताई अनंतराव पवार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अशी पाटी पाहताच दादा थोडे अस्वस्थ झाले. आता काय करावं असं त्यांना झालं. मग त्यांनी त्या पाटीवरील मुख्यमंत्री हा शब्द आपल्या शालने झाकून घेतला. तेव्हा कार्यकर्ते आणि पत्रकारांनी मुख्यमंत्री शब्द का झाकताय, दिसू द्या, असं म्हटलं. कार्यकर्ते म्हणाले आमची तीच इच्छा आहे. पण, दादांनी तो शब्द दिसू दिला नाही. जेव्हा कार्यकर्ते हट्ट धरु लागले तेव्हा अजितदादा म्हणाले, इच्छा आहे असं म्हणून जर कोणी मुख्यमंत्री झालं असतं तर आबादी आबाद झालं असतं. त्याला मॅजिक फिगर लागते. यावेळी त्यांनी 145 या बहुमताच्या आकड्याचा उल्लेखही केला.

 'मुख्यमंत्रिपदा'वर दादांचा हात, कार्यकर्त्यांची इच्छा दादांनी झाकली; नेमकं काय घडलं? VIDEO
Yugendra Pawar Vs Ajit Pawar : बारामतीमध्ये पवारांचे शक्तीप्रदर्शन, नातवासाठी शरद पवार मैदानात, काका-पुतणे भरणार अर्ज!

1991 साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले. त्याच वर्षी राजीनामा देऊन ते विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर 1995 ते 2019 असे सलग सात वेळा ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. आता आठव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत

 'मुख्यमंत्रिपदा'वर दादांचा हात, कार्यकर्त्यांची इच्छा दादांनी झाकली; नेमकं काय घडलं? VIDEO
Indapur Politics: इंदापुरात बंडाचा झेंडा! हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरुन शरद पवारांना इशारा; परिवर्तन मेळाव्यात काय ठरलं?

खरंतर मुख्यमंत्री होण्याची दादांची इच्छा कधी लपून राहिली नाही. खुद्द अजितदादांची आई आशा पवार यांनीही माझ्या हयातीत दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा मागच्या वर्षी बोलून दाखवली होती. जुलै महिन्यात दादांच्या वाढदिवसाला पिपरींच्या कार्यकर्त्यांनी अनोखा केक भेट दिला होता. त्यावर “मी…अजित आशा अनंतराव पवार, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…” असा उल्लेख होता. अजित पवार आत्तापर्यत पाच वेळा उपमुख्यमंत्री झालेत. आगामी काळात ते सीएम होऊन त्यांच्या आईचं आणि हजारो कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण करतात का ते पहाणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com