Indapur Politics: इंदापुरात बंडाचा झेंडा! हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरुन शरद पवारांना इशारा; परिवर्तन मेळाव्यात काय ठरलं?

Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा नाहीतर मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल, असे म्हणथ दशरथ माने परिवर्तन मेळाव्यातून थेट इशारा दिला.
Indapur Politics: इंदापुरात बंडाचा झेंडा! हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरुन शरद पवारांना इशारा; परिवर्तन मेळाव्यात काय ठरलं?
Harshvardhan Patil And Sharad PawarSaam Tv
Published On

Indapur Politics: सोमवारी सात ऑक्टोबरला इंदापुरात भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांची इंदापुरमधून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील निष्ठावत कार्यकर्त्यांचा त्याला विरोध होताना दिसत आहे. अशातच आज झालेल्या परिवर्तन मेळाव्यात शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचा निर्णय मागे घ्यावा, असा थेट इशारा देण्यात आला आहे.

बंडाचा झेंडा फडकणार?

इंदापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा परिवर्तन मेळावा पार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातून इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक असलेले प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शहा यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतल्याने इच्छुक उमेदवारानी नाराजी व्यक्त केली. तसेच या मेळाव्यातून इंदापुरमध्ये बंडखोरी करण्याचे थेट संकेतही दिले. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा नाहीतर मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल, असे म्हणथ दशरथ माने परिवर्तन मेळाव्यातून थेट इशारा दिला.

काय म्हणाले प्रविण माने?

"इंदापूर तालुक्यात परिवर्तन करायचं आहे. गेली 24 वर्ष ताई आणि साहेबांच्यासोबत आपण राहिलो आहे. या 24 वर्षात पक्षाने कोणताही अन्याय केलेला नाही. आज आपण काय निर्णय घ्यावं यासाठी जनतेत आलो आहे. जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे. इंदापूर तालुक्यातील परिवर्तन साठी हा मेळावा आहे. उजनी धरणातून आपल्याला आठ महिने पाणी मिळते, जेव्हा पीक काढायला येत तेव्हाच पाणी मिळत नाही. ही निवडणूक येणाऱ्या नव्या पिढीसाठी महत्वाची आहे. खडकवासला धरणाचा आवर्तन मिळालं पाहिजे यासाठी आपल्याला परिवर्तन पाहिजे, असे म्हणत प्रविण माने यांनी इंदापुरमध्ये राजकारण तापणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Indapur Politics: इंदापुरात बंडाचा झेंडा! हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरुन शरद पवारांना इशारा; परिवर्तन मेळाव्यात काय ठरलं?
Maharashtra Politics : शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 25 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

दरम्यान, राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षातील विधानसभेला नाराज इच्छूक उमेदवार जिल्हा बैंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्या परीवर्तन मेळाव्यात बॅनर बाजी करण्यात आली. यामध्ये नको आजी नको माजी, आता हवा नवीन बाजी! आम्हाला इंदापुरचा कारभारी स्वच्छ चरित्र प्रामाणिक उच्च शिक्षित लोकांची कामे करणारा पाहिजे आणि तो फक्त एकच आहे. प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, असे मजकूर असलेले बॅनरही यावेळी झळकावण्यात आले.

Indapur Politics: इंदापुरात बंडाचा झेंडा! हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरुन शरद पवारांना इशारा; परिवर्तन मेळाव्यात काय ठरलं?
Pune Crime: दांडिया कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने वार, जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; पुण्यातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com