

ऐरोलीमध्ये नगरसेवकाला महिलेकडून मारहाण
अतिक्रमण कारवाईवरून वाद वाढला
चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न
नवी मुंबईतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नवी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला भररस्त्यात मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये रविवारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. नगरसेवकाकडून काहीच कामं योग्यरित्या झाली नाही त्यामुळे या महिलेने नाराजी व्यक्त करत थेट नगरसेवकाला मारहाण केली. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी ऐरोलीच्या यादवनगरमध्ये आले होते. त्यावेळी ही महिला पालिकेकडून होणारी कारवाई थांबवण्यात यावी अशी विनंती करण्यासाठी स्थानिक नगरसेवक राम आशिष यादव यांच्याकडे गेली होती. पण नगरसेवकाने या महिलेला मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर महिलेने भररस्त्यात नगरसेवकाला चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.