Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट; नवीन वेळापत्रक जारी

Navi Mumbai Airport New Flights: नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट उड्डाणे करणार आहेत. उन्हाळ्यातील फ्लाइट वेळापत्रक जारी केले आहे.
Navi Mumbai Airport
Navi Mumbai AirportSaam Tv
Published On
Summary

नवी मुंबई एअरपोर्टवर ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट

नवी मुंबई एअरपोर्टने वेळापत्रक केलं जारी

देशांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढेल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने उन्हाळ्यासाठी फ्लाइट शेड्युल जारी केले आहे. २९ मार्च ते २४ ऑक्टोबरपर्यंतच्या विमानाचे वेळापत्रक जारी केले आहे. याअंतर्गत आता नवी मुंबई एअरपोर्टवरुन देशातील ४६ शहरांमध्ये विमान उड्डाणे होणार आहे. यामध्ये आता ३० नवीन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विविध शहरे, पर्यटन स्थळ आणि धार्मिक जागांना भेट देता येणार आहे. देशांतर्गत कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

Navi Mumbai Airport
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भयंकर अपघात, ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या, ३ जणांचा जागीच मृत्यू

दिल्लीसाठी सर्वात जास्त फ्लाइट

नवी मुंबई एअरपोर्टवरुन सर्वात जास्त फ्लाइट दिल्लीसाठी असणार आहे. ९ फ्लाइट दिल्लीला जाणार आहेत. गोव्यासाठी ७ फ्लाइट, बंगळुरुसाठी ६ फ्लाइट कोचीनसाठी ५ फ्लाइट असणार आहे. याचसोबत हैदराबाद, कोलकत्ता, लखनऊ, वाराणसी आणि इंदौरमध्येही अनेक फ्लाइटे उड्डाण होणार आहे. यामध्ये इंडिगो, अकासा, एअर इंडियाच्या फ्लाइट्सचा समावेश असणार आहे.

रोज १५६ फ्लाइट्स

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई एअरपोर्टवरुन एका आठवड्यात १०९२ फ्लाइट्स उड्डाणे करतील. दिवसाला १५६ फ्लाइट्स उड्डाण करतील. जेव्हा विमानतळ सुरु झालं तेव्हा फक्त २२ फ्लाइट्स होत्या. एप्रिल २०२६ मध्ये ही संख्या ७८ फ्लाइट्सवर गेली. यानंतर आता आठवड्याला २५६ फ्लाइट्स उड्डाण करणार आहेत.

Navi Mumbai Airport
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास सुपरफास्ट होणार; गेम चेंजर 'मिसिंग-लिंक' कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

कोणकोणत्या नवीन शहरांसाठी फ्लाइट्स

नवी मुंबई एअरपोर्टवरुन ३० नवीन शहरांसाठी फ्लाइट्स उड्डाणे करतील. यामध्ये आग्रा, छत्रपती संभाजी नगर, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगढ, देहारादून, दिव, गोवा, गोरखपूर, जबलपूर, राजकोट, जम्मू, कन्नूर, कोल्हापूर, मदुरै, कोलकत्ता, पटना, रायपुर, श्रीनगर, तिरुपती, त्रिवेंद्रम आणि वायजागचा समावेश आहे.

Navi Mumbai Airport
Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्ट प्रवाशांसाठी सुरु! पहिलं विमान दाखल | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com