Navi Mumbai: दारूसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, लाथाबुक्क्या अन् काठीने बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत दारूसाठी २ गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली. लाथाबुक्क्या अन् काठीने एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

पनवेलमध्ये दारूसाठी दोन गट आमने-सामने आले. खांदा गावात मध्यरात्री २ वाजता वाईन शॉपवर दारू घेण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. लाथाबुक्क्या अन् काठीने एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेला निवडणुकीतील वादाची पार्श्वभूमी असल्याचंही समोर येत आहे. या हाणामारीत काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या हाणामारीच्या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होते.

या घटनेचे थरारक व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत काही आरोपींना अटक केली असून काही आरोपी अद्याप मोकाट असल्याची माहिती मिळत आहे. पनवेल पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com