

खारघर येथील प्रसिद्ध आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा धबधब्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहात बुडून मयत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल आणि आज अशा दोन दिवसांत या दुर्घटना घडल्या असून, फायर ब्रिगेड (अग्निशामक दल) च्या मदतीने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू केला मात्र, अद्याप दोघांचेही मृतदेह हाती लागलेले नाहीत.
पावसाळ्यामुळे नवी मुंबईतील पांडवकडा धबधबा पर्यटकांनी फुलून गेला असून मोठ्या संख्येने पर्यटकांनी येथे गर्दी केली आहे. धबधब्याचे मनमोहक सौंदर्य, हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्याचवेळी एक दुर्घटना घडली आहे. दोन तरुण धबधब्यात बुडाले आहेत.
तळोजा फेज १ (सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ) येथील रहिवासी असलेला मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद (वय २० वर्षे) हा पांडवकडा परिसरात पाण्याच्या प्रवाहात बुडाला.
तर दुसरी सांताक्रुझ, मुंबई (कलिना कोबविरी व्हिलेज, घर नं. १०५) येथील रहिवासी असलेला शेण्णोन गॅस्पर किनी (वय १९ वर्षे) हा तरुण धबधब्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.