Ratnagiri News : कोकणात मोठी दुर्घटना! गणपतीपुळे समुद्रात संभाजीनगरचे ८ जण बुडाले

Ganpatipule Beach : रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगरच्या आठ जणांपैकी पाच जण समुद्रात बेपत्ता झाले आहेत. तिघांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
Ganpatipule beach
Ganpatipule beach
Published On

five tourists missing at Ganpatipule beach : रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. गणपतीपुळे येथे समुद्रात उतरलेले छत्रपती संभाजीनगरमधील ८ पर्यटक समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याची घटना घडली आहे. यातील ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. पण ५ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. आज (शनिवार) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून काही पर्यटक गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. यातील एकूण ८ जण सकाळी समुद्रात उतरले होते. मात्र, भरती आणि समुद्राच्या पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात वाहून जाऊ लागले.

Ganpatipule beach
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल २० वर्षांनंतर लागणार, माजी गृहमंत्र्यांसह ९ आरोपींना हजर राहण्याचे आदेश

समुद्रात पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. ८ पैकी ३ पर्यटकांना सुखरूपपणे समुद्राबाहेर काढण्यात यश आले आहे. ३ जणांचे प्राण वाचले आहेत. मात्र, उर्वरित ५ जण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनास्थळी पोलीस व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ganpatipule beach
लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

युद्धपातळीवर शोधकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. बेपत्ता असलेल्या पाचही पर्यटकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छीमार, जीवरक्षक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे. अद्याप कोणाचाही ठावठिकाणा लागलेला नसून, शोधकार्य वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात आणि पर्यटकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ganpatipule beach
सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com