लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

Lohagad Fort Accident, Ketan Agrawal Death : लग्नासाठी उदयपूरमध्ये १४ कोटी रुपयांचा आलिशान पॅलेस बुक करण्यात आलेला असताना, होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या २६ वर्षीय केतन अग्रवालचा ४०० फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
Lohagad Fort Accident, Ketan Agrawal,
Lohagad Fort Accident, Ketan Agrawal,Saam
Published On

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pune Lohagad Accident News : अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेल्या एका तरुणावर नियतीने क्रूर घाला घातला आहे. होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या २६ वर्षीय मुलाचा ४०० फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत तरुणाचे नाव केतन विशाल अग्रवाल (वय २६, रा. लोढा बेलमोंडो सोसायटी, गहुंजे, ता. मावळ) असे आहे. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. केतनदेखील याच व्यवसायात कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, दोन चुलते आणि दोन चुलत भाऊ असा परिवार आहे.

Lohagad Fort Accident, Ketan Agrawal,
शिक्षक चळवळीचा महामेरू हरपला; आमदार देशमुख यांचे अमरावतीत निधन!

मिळालेल्या माहितीनुसार, होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त केतन गुरुवारी सकाळी तिच्यासोबत कारने लोहगड किल्ल्यावर आला होता. दोघे गडावर ट्रेकिंग करत असताना एका कड्यावरून अचानक केतनचा तोल गेला आणि तो थेट ४०० फूट खोल दरीत कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Lohagad Fort Accident, Ketan Agrawal,
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल २० वर्षांनंतर लागणार, माजी गृहमंत्र्यांसह ९ आरोपींना हजर राहण्याचे आदेश

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 'शिवदुर्ग मित्र' आपत्कालीन पथकाला तातडीने पाचारण केले. या पथकाने जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घनदाट झाडीत अडकलेला मृतदेह दरीतून बाहेर काढून गडाच्या पायथ्याशी आणला. त्यानंतर सायंकाळी उशिरा निगडी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात केतनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Lohagad Fort Accident, Ketan Agrawal,
IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

दरम्यान, केतनच्या विवाहसोहळ्याची तयारी दोन्ही कुटुंबीयांकडून अत्यंत जंगी पातळीवर सुरू होती. राजस्थानमधील उदयपूर येथे भव्य लग्नासाठी तब्बल १४ कोटी रुपये खर्चून एक आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन स्वतंत्र विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या ग्रँड विवाहसोहळ्याच्या स्वप्नवत तयारीदरम्यानच काळाने झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Lohagad Fort Accident, Ketan Agrawal,
"ते सेल्फी पूर्णपणे मॉर्फ केलेले..."; व्हायरल फोटोंवर मंत्री गिरीश महाजनांचा सर्वात मोठा आणि थेट खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com