IMD Alert : रखडलेला मॉन्सून 'या' दिवशी पुन्हा ॲक्टिव्ह; 'या' जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा, तर मुंबई-ठाण्याला उष्णतेचा इशारा

Maharashtra Monsoon Weather Update : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र मंगळवारपासून मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे.
वातावरण बदलणार, महाराष्ट्रासह या राज्यांत पावसाचा अंदाज, वादळी वारेही झोडून काढणार
weather alert todaysaam tv
Published On

Maharashtra Weather Update : पुढील ४ दिवस पावसाची शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पण मंगळवारपासून मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक हवामान तयार होईल. त्यानंतर १ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. (Maharashtra monsoon arrival latest update)

८ जूनपासून रखडलेला मॉन्सूनचा प्रवास पुढील आठवड्यात मंगळवारपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, १ जुलैपर्यंत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल आणि पावसासाठी अनुकूल हवामान तयार होईल. मात्र, या काळात कोकण वगळता राज्यातील इतर भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील, असा अंदाज IMD वर्तविला आहे.

वातावरण बदलणार, महाराष्ट्रासह या राज्यांत पावसाचा अंदाज, वादळी वारेही झोडून काढणार
शिक्षक चळवळीचा महामेरू हरपला; आमदार देशमुख यांचे अमरावतीत निधन!

आज कुठे कुठे पाऊस कोसळणार?

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात आज उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यत आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे.

वातावरण बदलणार, महाराष्ट्रासह या राज्यांत पावसाचा अंदाज, वादळी वारेही झोडून काढणार
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल २० वर्षांनंतर लागणार, माजी गृहमंत्र्यांसह ९ आरोपींना हजर राहण्याचे आदेश

महाराष्ट्रात लवकरच आगमनाचा अंदाज

मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आता पोषक हवामान तयार होत आहे. सोमवारी (ता. १५) मॉन्सूनने संपूर्ण आंध्र प्रदेशसह तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड राज्याच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. १९) मॉन्सूनची वाटचाल काहीशी संथ म्हणजेच 'जैसे थे' होती. मात्र, आगामी मंगळवारपर्यंत (ता. २३) महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग, तसेच छत्तीसगडच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता कायम असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

वातावरण बदलणार, महाराष्ट्रासह या राज्यांत पावसाचा अंदाज, वादळी वारेही झोडून काढणार
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अन् ३ महिन्यांचा अल्टीमेटम

उष्ण व दमट हवामानाची शक्यता (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, अकोला, वर्धा, चंद्रपूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

उन्हाचा चटका कायम असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ४२.३, मालेगाव ४१, अकोला ४१, वर्धा ४१.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com