Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

Two Youths Drowned In Alibag: अलिबागमध्ये समुद्रात दोन जण बुडाल्याची घटना घडलीय. पोलीस आणि बचाव पथकांकडून तरुणांचा शोध घेतला जात आहे.
Two Youths Drowned In Alibag
Rescue teams and drones deployed in Alibaug sea after two youths went missing while swimming.saam tv
Published On
Summary
  • अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडाले.

  • शशांक सिंग आणि पलाश पखर अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत.

  • तासाभरापासून दोघांचा शोध सुरू

सचिन कदम, साम प्रतिनिधी

अलिबागमध्ये एक दुखद घटना घडलीय. येथील समुद्रात दोन तरूण बुडाले आहेत. पोलीस यंत्रणा आणि जीवरक्षक तासाभरापासून दोघांचा शोध घेत आहेत. ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीनं तरुणांचा शोध घेतला जात आहे. शशांक सिंग आणि पलाश पखर अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत. उरण नवी मुंबई परिसरातून मित्र फिरायाले आले होते, अशी माहिती अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिलीय.

Two Youths Drowned In Alibag
Pune Gang War: आंदेकर टोळीतल्या समीर काळेचा भाऊ गणेश काळेला का संपवलं? जुनं कनेक्शन आलं समोर

अलिबाग येथील समुद्रात बुडून दोन पर्यटक तरुण बेपत्ता झाल्याची घटना आज संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ड्रोन आणि बॅटरीच्या सहाय्याने पोलिस आणि जीवरक्षक या दोघांचा शोध घेत आहेत. शशांक सिंग (१९) रा. उलवे ता. उरण आणि पलाश पखर (१९) रा. सानपाडा नवीमुंबई अशी बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत. उरण नवी मुंबई परिसरातील चार मित्र अलिबागला फिरायला आले होते. संध्याकाळच्या सुमारास यातील एकजण पोहायला उतरला.

Two Youths Drowned In Alibag
पुण्यात गँगवॉर! आंदेकर टोळीतील समीर काळेच्या भावावर गोळीबार; गोळ्या झाडल्यानंतर कोयत्यानं हल्ला

तो बुडू लागल्याने दुसरा त्याला वाचवायला गेला. मात्र दोघेही बुडून बेपत्ता झाल्याची माहिती अलिबागचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ जीवरक्षकाना पाचारण करण्यात आले. रात्रीच्या अंधारात ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीने शोध सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com