Pune Gang War: आंदेकर टोळीतल्या समीर काळेचा भाऊ गणेश काळेला का संपवलं? जुनं कनेक्शन आलं समोर

Pune Gang War Ganesh Kale Killed In Kondhwa : पुण्यातील कोंढवा परिसरात गँगवॉर झाल्याची घटना घडलीय. आंदेकर टोळीचा सदस्य समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळ्या घालून कोयत्याने हल्ला करण्यात आला. वनराज आंदेकर हत्याकांडाशी जुन्या टोळीतील वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Pune Gang War Ganesh Kale Killed In Kondhwa
Kondhwa murder scene: Ganesh Kale, brother of Andekar gang member Samir Kale, shot and hacked to death in broad daylight.
Published On
Summary
  • दोन दुचाकीवर वरून आलेल्या ४ तरुणांनी झाडल्या गोळ्या

  • सूड भावनेने हा खून केल्याची माहिती

  • गणेश काळे वर ६ राऊंड फायर

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यातील कोंढवा परिसरात गँगवॉरची घटना घडलीय. आंदेकर टोळीतील समीर काळेचा सख्खा भाऊ गणेश काळेचा खून करण्यात आला. गणेश काळेवर आधी गोळ्या झाडण्यात आल्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. पुण्यातील कोंढवा परिसरात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हा हत्याकांड घडला. समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणात अटकेत आहे.

गणेश काळे हा रिक्षा चालक होता. त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात दोन दुचाकीवर आलेल्या दोघांनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या गणेश काळेवर ६ गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या गणेश काळेला लागल्या. त्यानंतर दुचाकीवरील दोघांनी गणेशवर कोयत्याचे वार केले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक असलेल्या गणेश काळेला का संपवण्यात आलं याचा मोठा खुलासा झालाय. गणेशचा खून हा पूर्वनियोजित होता. वनराज आंदेकर याच्या खूनाच्या बदल्यातून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. गणेश काळेचा खून करण्यासाठी दोन आरोपी त्याच्या मागावर होते. त्यांनी गणेशला रिक्षात बसू दिले, काही अंतर कापल्यानंतर त्यांनी गणेशवर हल्ला केला.

गणेश काळेचं वय साधरण ३० ते ३५ वर्ष होतं. आज दुपारी तीन वाजता कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात दोघांनी गणेशचा खून केला. गणेश काळेचा सख्खा भाऊ समीर काळे हा भाऊ वनराज आंदेकर खून प्रकरणात अटकेत आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या आंदेकर यांनी केलीय. त्यानंतर आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली. कोमकर याच्या हत्याकांडातील आंदेकर टोळीतील सर्वच आरोपींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर पुण्यातील गँगवॉर बंद झाल्याचं म्हटलं जात होतं.

पण आंदेकर टोळीतील नंबरकाऱ्याच्या भावाला ठार केल्याने पुणे पोलिसांच्या डोळ्यासमोर टोळीयुद्धाचा रक्तरंजित थरार सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान पोलिसांकडून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. याबाबत पोलrस सगळे CCTV तपासात आहेत. घटनास्थळी पंचनामा पूर्ण झाला आहे. लवकरच आरोपींना अटक करू. मयत गणेश काळे हा रिक्षा चालक आहे, तो येवलेवाडी परिसरात राहत होता. दोनजण गाडीवरून आले आणि गोळीबार केला. २ दुचाकी घेऊन आरोपी आले होते त्यातील १ दुचाकी जागेवरच सापडली आहे, अशी माहिती राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com