

सचिन जाधव , साम प्रतिनिधी
पुण्यातील गँगवॉरच्या घटना अजूनही थांबल्या नाहीयेत. शहरातील कोंढवा परिसरात गोळीबाराची घटना घडलीय. या गोळीबारात आंदेकर टोळीतील समीर काळेचा भाऊ गणेश काळेचा मृत्यू झालाय. आरोपीने गणेश काळेवर ४ गोळ्या झडल्या. त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले. पुण्यातील सासवड रोडवर गोळीबाराची घटना घडली, यात गणेश काळेचा मृत्यू झाला.
पुण्यातील सासवड रोडवर गोळीबाराची घटना घडली, यात गणेश काळेचा मृत्यू झाला. आरोपीने गणेश काळेवर ६ गोळ्या झडल्या. त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले. गणेश काळेचा खून सूड बुद्धीनेच केला गेलाय. याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोन दुचाकीवर वरून आलेल्या ४ तरुणांनी गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. गणेश काळे यावर एक गुन्हा दाखल असून तो रिक्षा चालक होता. गणेश हा समीर काळे याचा भाऊ असून त्याचा खून सूड भावनेने केल्याचा आहे.
गणेशचा खून हा पूर्वनियोजित असून वनराज आंदेकर याच्या खूनाच्या बदल्यातून हे कृत्य केल्याचं सांगितलं जातं.वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणून आंदेकर टोळीनं आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमगारची हत्या केली. ही घटना अद्याप ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार घडला.
कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आलाय. बंडू आंदेकर गट आणि कोमकर टोळीतील वैर मागील वर्षभरापासून पेटलंय. दरम्यान आयुष कोमकर हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला तसेच आंदेकरांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना अटक केली आहे.
आंदेकर टोळीतील लोक गेल्या ८ वर्षांपासून खंडणी उकळत होते. तर पैसे दिले नाही तर व्यावसायिका जिवे मारण्याची धमकी द्यायचे. आंदेकर टोळीने व्यवसायासाठी 'प्रोटेक्शन मनी'च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली होती. आंदेकर टोळीकडून खंडणी वसुलीचा हा सगळा प्रकार २०१७ पासून सुरू होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.