नवी मुंबईत 'हिट अँड रन', बेलापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३८ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू

Navi Mumbai Hit And Run Case Near CBD Belapur Details: नवी मुंबईतील सीबीडी बेलापूरजवळ सायन-पनवेल महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत ३८ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू झाला आहे.
Scooter rider killed in a hit-and-run accident near CBD Belapur on Sion-Panvel Highway; police searching for absconding driver.
Scooter rider killed in a hit-and-run accident near CBD Belapur on Sion-Panvel Highway; police searching for absconding driver.Saam tv
Published On

सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी बेलापूरजवळ शनिवारी संध्याकाळी एक भीषण 'हिट अँड रन'ची घटना घडली. एका अज्ञात भरधाव वाहनाने मागून स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर जखमी चालकाला कोणतीही मदत न करता आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात ३८ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू झाला आहे.

Scooter rider killed in a hit-and-run accident near CBD Belapur on Sion-Panvel Highway; police searching for absconding driver.
कल्याण हादरले! चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

सीबीडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार, शैलेंद्र परमहंस सिंग (रा. सेक्टर १, वाशी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावरील पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर, उरण फाटा पुलाच्या पुढे सीबीडी खिंडीजवळ घडला.

Scooter rider killed in a hit-and-run accident near CBD Belapur on Sion-Panvel Highway; police searching for absconding driver.
Pune Robbery News |आजोबांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून 27 लाख लंपास केले! कसे सापडले पोलिसांच्या हाती?

शैलेंद्र सिंग हे त्यांच्या ॲक्टिव्हा स्कूटरवरून (क्र. MH-43-CL-3277) जात असताना, एका अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे आणि जोरात येऊन त्यांच्या स्कूटरला मागून धडक दिली. या भीषण धडकेत सिंग गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या स्कूटरचेही मोठे नुकसान झाले आहे.

Scooter rider killed in a hit-and-run accident near CBD Belapur on Sion-Panvel Highway; police searching for absconding driver.
New Mumbai- Pune Expressway: गुड न्यूज! मुंबईवरुन पुण्याला पोहचा फक्त ९० मिनिटांत, तयार होतोय नवा ८ पदरी 'एक्स्प्रेस वे'

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी सांगितले की, या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०६(१), २८१ आणि ३२४(२) सह मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चालक आणि वाहनाचा शोध अजून लागलेला नाही. वाहनाचा शोध कघेण्यासाठी पोलीस पथके सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची तपासणी करत आहेत. याप्रकरणी ऐरोली येथील व्यावसायिक धनजी गोकर मुतक (३६) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अरुण भिलारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com