कल्याण हादरले! चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Husband Kills Wife Over Character Suspicion In Titwala: टिटवाळ्यात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Police investigating the crime scene after a woman was allegedly killed by her husband in Titwala following a domestic dispute.
Police investigating the crime scene after a woman was allegedly killed by her husband in Titwala following a domestic dispute.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: टिटवाळा परिसरात चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी पती सतीश वाघे याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सतीश वाघे आणि त्याची पत्नी सारिका उर्फ रुक्सार वाघे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.

Police investigating the crime scene after a woman was allegedly killed by her husband in Titwala following a domestic dispute.
New Mumbai- Pune Expressway: गुड न्यूज! मुंबईवरुन पुण्याला पोहचा फक्त ९० मिनिटांत, तयार होतोय नवा ८ पदरी 'एक्स्प्रेस वे'

रविवारी सकाळच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात सतीश वाघे याने घरातील हंड्याने पत्नीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सारिका उर्फ रुक्सार वाघे गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Police investigating the crime scene after a woman was allegedly killed by her husband in Titwala following a domestic dispute.
NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, पुण्यातून मुख्याध्यापिकेला अटक

घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी सतीश वाघे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com