

तुम्हाला आंबा आवडतो म्हणून तुम्हीही बाजारातून आंबे घरी आणून खात असाल... मात्र असं करण्यापूर्वी ही बातमी वाचा...नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आणि परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केलीये. ३० आणि ३१ मे रोजी राबवलेल्या या धाडसत्रात भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर कठोर कारवाई करण्यात आलीये.
या कारवाईमध्ये आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इथिलिन स्प्रेचा गैरवापर उघडकीस आला. अशा प्रकारे आंबे पिकवणाऱ्या तीन प्रतिष्ठानांवर छापा टाकून एकूण ३,४५३ किलो आंबे जप्त करण्यात आले आहेत. या जप्त आंब्यांची बाजारात किंमत अंदाजे ११.१२ लाख रुपये इतकी आहे. हे आंबे सुरक्षित नसल्याने ते विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
याचबरोबर नवी मुंबई आणि ठाणे परिसरात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधी मोहिमेतही मोठी कारवाई करण्यात आलीये. या मोहिमेदरम्यान सुमारे ४ लाख ७४ हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ३६ प्रतिष्ठानांवर धाड टाकण्यात आली असून त्यापैकी ३१ दुकाने सील करण्यात आली आहेत. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ३७ जणांना अटकही करण्यात आलीये.
नागरिकांनी अशा भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित पदार्थांची माहिती प्रशासनाला द्यावी, असं अन्न आणि औषध प्रशासनाकडून आवाहनही करण्यात आलंय. यासाठी FDA ने टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ जाहीर केलाय. या कारवाईनंतर एपीएमसी परिसरात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत अशा तपासण्या अधिक तीव्र केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
बाजारातून आणलेल्या आंब्यावर इथिलिन स्प्रे किंवा कृत्रिम पिकवण्याची प्रक्रिया झाली आहे का हे काही लक्षणांवरून समजू शकतं. अशा आंब्यांचा रंग खूपच एकसारखा, चमकदार आणि कृत्रिम वाटतो, तर नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यांमध्ये रंग थोडा वेगळा असतो. बाहेरून आंबा पूर्ण पिवळा दिसला तरी कापल्यावर आतून तो पूर्णपणे पिकलेला नसू शकतो. नैसर्गिक आंब्याला गोड, ताजं आणि फळांसारखा सुगंध येतो, तर कृत्रिम पिकवलेल्या आंब्यांचा वास कमी किंवा फिकट जाणवतो.
इतकंच नाहीत चव आणि टेक्सचरवरही फरक जाणवतो. नैसर्गिक आंबा रसाळ, मऊ आणि खोल गोड चवीचा असतो, तर कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा कधी कधी वरून गोड पण आतून सपाट चवीचा वाटतो. काही वेळा त्यात बाहेरचा भाग मऊ आणि आतला भाग थोडा कडकही राहतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.