अमेरिकेत हादरवणारं हत्याकांड
एका तरुणाने ६ नातेवाईकांची गोळ्या झाडून हत्या केली
आरोपीने आत्महत्या केली
कौटुंबिक वादातून घटना घडली
पोलिसांचा तपास सुरू
America 6 Murder 1 Sucide News अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्याच घरातील ६ जणांची गोळ्या झाडून हत्या केली. एवढचं नाही तर या तरुणाने स्वतः देखील आत्म्हहत्या केली. सदर रक्तरंजित घटना अमेरिकेतील आयोवा राज्यातील मस्काटीन शहरात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ जून रोजी दुपारी घडली. स्थानिक पोलिसांना दुपारी सुमारे १२.१२ वाजता एका घरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. पोलिस आणि आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घरात ६ जणांचे मृतदेह आढळून आले. सर्वांचा मृत्यू गोळी लागल्यामुळे झाला होता. मात्र, संशयित आरोपी रायन विलिस मॅकफारलँड घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याचा शोध सुरू करण्यात आला.
आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांनी त्याला एका मिसिसिपी नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या एका ट्रेलवर पकडला. पोलीस त्याला हत्येचा जाब विचारत असतानाच त्याने स्वतःवर गोळी झाडली. त्यानंतर मॅकफारलँड जागीच कोसळला. पोलिसांनी त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या ६ जणांची हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आली. मृतांपैकी सर्वजण आरोपीचे नातेवाईक असल्याचे पोलिसांनी म्हटले. तसेच आरोपीविरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मस्काटीन शहरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.