Nashik News : धक्कादायक! एका वर्षांच्या चिमुरड्याने गिळली बामची डबी, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

baby care tips in Marathi : नाशिकमध्ये एका वर्षांच्या चिमुरड्याने बामची डबी गिळल्याची घटना घडली आहे. बामची डबी गिळल्यानंतर चिमुकल्याला श्वास घेणंही कठीण झालं.
धक्कादायक! एका वर्षांच्या चिमुरड्याने गिळली बामची डबी, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik NewsSaam tv
Published On

मुंबई : तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष ठेवा. कारण नाशिकच्या मनमाडमध्ये एका १ वर्षांच्या मुलाने कुटुंबीयांच्या न कळत बामची डबी गिळली आणि अस्वस्थ झाला. पालकही हैराण झाले होते. आता काय करावं हेदेखील त्यानं सुचत नव्हतं. मुलाने डबी गिळताच त्यांनी घरातच काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुकल्याला श्वास घेणंही कठीण झाल्याने रडून रडून हैराण झाला. अखेर पालकांनी मुलाला थेट हॉस्पिटलमध्ये नेलं.

ही घटना नाशिकच्या मनमाड जवळील पाणेवाडी येथील सागर काकड यांच्या घरी घडली...काकड कुटुंब रात्री घरात जेवण करत असताना त्यांचा 1 वर्षाचा मुलगा मल्हार याने बामची डबी गिळली. मुलाने डबी गिळली हे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी ती काढण्याचा प्रयत्न केला.

धक्कादायक! एका वर्षांच्या चिमुरड्याने गिळली बामची डबी, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?
Doctors wear green clothes: हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात?

मात्र, ती आणखी आत घुसल्याने काकड कुटुंबाने चिमुरड्याला तातडीने मनमाडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यावेळी लहानग्या मल्हारच्या घशाला ईजा होऊन त्याचा रक्त स्त्राव सुरु झाला होता. तर ऑक्सिजन पातळी कमी होऊन फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन पुरवठा कमी होत होता. मात्र अशा परिस्थितीत डॉक्टर रविंद्र राजपूत आणि विजय राजपूत यांनी शर्थीचे प्रयत्न करीत लरिंगोस्कोपच्या मदतीने यशस्वीरित्या ही डबी बाहेर काढली.

धक्कादायक! एका वर्षांच्या चिमुरड्याने गिळली बामची डबी, हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?
Kolkata Doctor Case : मला अडकवलं जातंय, डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती; कोलकाता डॉक्टर प्रकरणात आरोपीचा खळबळजनक दावा

काही वेळेच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांनी यशस्वीपणे गिळलेली डबी बाहेर काढल्याने काकड कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, मुलाने डबी गिळल्याने कुटुंबीयांची पाचावर धारण बसली होती...अशी छोटीशी चूक जीवावरही बेतली असती. त्यामुळे तुम्ही मुलांना एकटं सोडू नका. त्यांच्यावर लक्ष ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com