Manmad-Indore Railway: मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग कसा असेल? कुठून जाणार, कधीपर्यंत सेवेत आणि फायदा काय?

Manmad-Indore Railway : केंद्रीय मंत्रिमंडळाने मनमाड आणि मध्य प्रदेशातील इंदौरदरम्यान 18,036 कोटी रुपयांच्या 309 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या प्रदेशांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
Manmad-Indore Railway: मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग कसा असेल? कुठून जाणार, कधीपर्यंत सेवेत आणि फायदा काय?
Manmad-Indore Railway
Published On

मुंबई ते इंदौरपर्यंतची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला. मुंबई ते इंदौरपर्यंतच्या रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलीय. मुंबईहून इंदौरपर्यंत तयार करण्यात येणारा रल्वेमार्ग मनमाड ते ३०९ किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावर ३० नवीन स्थानके बांधण्यात येतील. तर या मार्गामुळे १००० गावांना लाभ होणार आहे. हजार गावांचं नशीब बदलणाऱ्या रेल्वे मार्गाचे काय फायदे होतील हे जाणून घेऊ.

कसा असेल रेल्वे मार्ग आणि मार्गाचे फायदे

या रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि इंदौरसारखे उद्योगांच्या हबमधील अंतर कमी होणार आहे. हा प्रकल्प २०२८-२९ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होणार आहे. हा रेल्वेमार्ग मनमाड आणि मध्य प्रदेशातील इंदौरदरम्यान असून यासाठी १८,०३६ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील महत्त्वाच्या प्रदेशांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे.

या रेल्वे मार्गाचा मालवाहतूक आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. इंदौर आणि मुंबई दरम्यानच्या ३०९ किलोमीटरच्या मार्गावर एकूण ६ जिल्हे येणार आहेत. यामुळे या जिल्ह्यांच्या संपर्क आणि विकासाला चालना मिळेल. मध्य भारताचा पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम भारताशी संपर्क वाढल्यास दोन्ही भागात पर्यटन उपक्रमही वाढणार आहेत.

सध्या मनमाड-इंदौरची सिंगल लाईन आहे. परंतु भविष्यात हा मार्ग दुहेरी लाईनचा करण्यात येणार आहे. सरकारने निवडून आल्यापासून ८५ दिवसांत २,४८,६७७ कोटी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिलीय. यात वाधवन बंदर हे जगातील सर्वात मोठे बंदर असणार असल्याचं रेल्वे मंत्री वैष्णव म्हणालेत.

हेही होतील फायदे

या मार्गामुळे उज्जैन- इंदौरचा विकास होणार आहे. पश्चिम भारतातील लोकांना महाकाल मंदिरात सहजपणे पोहोचू शकतील. याचप्रमाणे धान्य उत्पादन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या भागातील कांद्याचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल इंदौरला नेण्यास सोपं होणार आहे. त्याचबरोबर शेतमाल, खते,स्टील, सिमेंट, इंधन आणि तेल सारख्या उत्पादनांची वाहतूक करणं सोपं होणार आहे. हा रेल्वे मार्गावर ३० स्थानके उभारण्यात आले आहे. या मार्गाचा थेट १००० गावांना फायदा होणार असून एकूण ३० लाख लोकांना थेट फायदा होणार आहे.

Manmad-Indore Railway: मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग कसा असेल? कुठून जाणार, कधीपर्यंत सेवेत आणि फायदा काय?
Manmad-Indore Railway: केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; मनमाड-इंदौर रेल्वे धावणार, शेतकऱ्यांचं होणार भलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com