ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकाने हॉस्पिटलमध्ये हिरव्या आणि निळ्या रंगाचे कपडे कर्मचाऱ्यांनी परिधान केलेल पाहिले असेल
तुम्हाला अनेकदा या रंगासंबंधित अनेक प्रश्न पडले असतील.
चला तर आज जाणून घेऊयात या पडलेल्या प्रश्ना विषयी.
अनेक वर्षाआधी हॉस्पिटलमध्ये हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे कोणीही परिधान करत नसत.
मात्र १९१४ या वर्षानंतर सर्व ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये पांढरा रंग सोडून हिरव्या रंगाचे कपडे परिधान करण्यास सुरुवात झाली.
हिरव्या रंग शितल असल्याने डोळ्यांना या रंगामुळे डॉक्टर आणि नर्सच्या डोळ्यांना आराम मिळत असे.
ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर अधिक वेळ असल्याने त्यांच्या डोळ्यांना आराम मिळावा.