आमदार मेहतांची मुजोरी संपेना, 'मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी'

Narendra Mehta’s ‘Jain City’ Remark: मिरा-भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांची मुजोरी संपेना असं चित्र आहे. मराठी-अमराठी वाद आणि मांसाहार बंदीमुळे आधीच वातावरण तापलेले असताना आमदार मेहतांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. मेहता नेमके काय म्हणालेत ? विरोधकांनी त्याला कसं प्रत्युत्तर दिलंय ?
Narendra Mehta Faces Criticism Over Controversial Mira Bhayandar Statement
Narendra Mehta Faces Criticism Over Controversial Mira Bhayandar Statementsaam tv
Published On: 

मिरा-भाईंदरमधील मराठी-अमराठी वाद असो किंवा पर्युषण काळात मांसविक्रीची बंदीची मागणी आमदार नरेंद्र मेहतांची वक्तव्य वाद निर्माण करतात. आता त्यांच्या ताज्या वादग्रस्त विधानाचे संतप्त पडसाद उमटलेत. मिरा-भाईंदर मिनी राजस्थान असून जैनांची नगरी असल्याचं संतापजनक विधान मेहतांनी एका जाहीर कार्यक्रमात केलंय.

मेहतांच्या या वादग्रस्त विधानानं पुन्हा राजकारण तापलंय. शिंदेसेनेला मेहतांचं वक्तव्य मान्य आहे का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय... तर मुख्यमंत्र्यांनी आमदाराला आवरावं, असं म्हणत मनसेने इशारा दिलाय.

मेहतांच्या वक्तव्यावरुन मराठी एकीकरण समितीही आक्रमक झाली आहे. सत्तेच्या गुर्मीत वागणाऱ्या आमदारावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी समितीनं केलीय. दरम्यान चौफेर टिका झाल्यानंतर मेहतांनी दिलगिरी व्यक्त केलीये. मी इतर कोणत्याही समाजाचा अनादर केला नसल्याचा दावा त्यांनी केलाय.

मेहतांचा हा पहिलाच वाद नाही. यापूर्वीच्या त्यांच्या वादग्रस्त घटना पाहूया..

- मेहतांच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूणवर बंदी घातल्याने पालक संतप्त

- पर्युषण पर्वात मांसाहार बंदीचे समर्थन

- मेहता यांच्याशी संबंधित कंपनीने भाईंदरमधील एका जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप

- सप्टेंबर 2026 मध्ये हा वाद थेट पंतप्रधानांपर्यंत पोचला, त्यानंतर संबंधिताला भूखंड परत

- बिल़्डरकडून मेहतांविरुद्ध खंडणीची तक्रार

-2020 - नगरसेविकेकडून लैंगिक शोषणाचा आरोप, त्यानंतर भाजपमधील पदांचा राजीनामा

- 2017 ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात

आमदार नरेंद्र मेहता 2014 आणि 2024 असे दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र सतत वादात राहणाऱ्या मेहतांना पक्ष आणि वरीष्ठांकडून बळ मिळत असल्यानेच त्यांची मुजोरी कायम आहे. त्यामुळे भाषा आणि धर्मावरून वाद निर्माण करणाऱ्या मेहतांच्या मुजोरीला आवर घालण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com