Lift Collapse: इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, ८ जण गंभीर जखमी; VIDEO समोर

Nalasopara Lift Collapsed: नालासोपाऱ्यातील एका इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. या घटनेत ८ जण गंभीर जखमी झालेत.
Lift Collapse: इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, ८ जण गंभीर जखमी; VIDEO समोर
Saam Tv
Published On: 
  • नालासोपारा पश्चिममध्ये लिफ्ट कोसळून ८ जण गंभीर जखमी

  • धनंजय एव्हेन्यू इमारतीतील पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली

  • लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुटका

मनोज तांबे, वसई

नालासोपाऱ्यामध्ये इमारतीची लिप्ट कोसळल्याची घटना घडली. ७ व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून ८ जण गंभीर जखमी झालेत. ही घटना नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क परिसरातील धनंजय एव्हेन्यू या इमारतीमध्ये घडली. लिफ्ट कोसळल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत लिफ्टमध्ये अडकलेल्या सातही जणांची सुटका केली. हे सातही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय एव्हेन्यू इमारतीमध्ये राहणारे नागरिक पाचव्या मजल्यावरून खाली येत होते. ८ जण लिफ्टमध्ये होते. त्याचवेळी अचानक लिफ्ट वेगाने खाली कोसळली. या घटनेत लिफ्टमध्ये असणारे सर्वजण गंभीर जखमी झाले. लिफ्ट कोसळल्याचे कळताच इमारतीमध्ये एकच गोंधळ उडाला. तात्काळ अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील काही नागरिकांच्या मदतीने सर्वांचे प्राण वाचवले.

Lift Collapse: इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, ८ जण गंभीर जखमी; VIDEO समोर
Virar: पोहण्यासाठी तलावात उडी मारली, परत बाहेर आलाच नाही; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

लिफ्टचा दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर आहे. लिफ्टच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांनी विकासकावर केला आहे. वारंवार तक्रारी करूनही लिफ्टची दुरुस्ती आणि तपासणी करण्यात आली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा रहिवाशांनी केला. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली असून अधिक तपास करत आहेत.

Lift Collapse: इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, ८ जण गंभीर जखमी; VIDEO समोर
Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.