विकास काटे, साम टीव्ही
ठाणे पालिका हद्दीतील मुंब्रा परिसरातील कादर पॅलेस संकुलात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अली नावाच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. हल्लेखोर हा पूर्वनियोजित उद्देशानेच आला असल्याचे दिसून येत आहे. संधी साधत त्यांनी धारदार शस्त्रांनी अलीवर वार करत त्याला गंभीर जखमी केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज सध्या तपासासाठी वापरण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, आरोपींची ओळख पटावी यासाठी परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. घटनेनंतर कादर पॅलेस आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.