Mumbai : प्रेयसीसमोर दुसऱ्या मुलीचं कौतुक महागात, चिडलेल्या प्रेयसीचा घरात घुसून बदला

Mumbai Crime News : मुंबईतील वर्सोव्यात प्रेमातील असूयेपोटी एका तरुणीने आपल्या मैत्रिणीचे केस कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
Mumbai woman
Mumbai woman
Published On

Mumbai woman cuts friend hair over boyfriend jealousy case: प्रेमातल्या ईर्षेपायी कोण कुठल्या थराला जाईल, सांगता येत नाही... मुंबईत असुयेपोटी आपल्याच मैत्रिणीचे केस कापून टाकल्याची घटना समोर आलीये. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

प्रेमातल्या ईर्षेपायी कोण कुठल्या थराला जाईल, सांगता येत नाही...कारण घटनाच तशी घडलीय.. आपल्या मैत्रीणीच्या लांबसडक काळेभोर केसांचं प्रियकरानं कौतूक केलं.... मात्र हे कौतुक प्रेयसीला खटकलं आणि.. ईर्षेपायी थेट मैत्रीणीच्या घरात घुसून प्रेयसीने तिचे केसच कापून टाकले..असुयेपोटी आपल्याच मैत्रिणीचे केस कापून टाकल्याची ही घटना घडलीय मुंबईच्या वर्सोव्यात...

Mumbai woman
Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांचा आणखी एक राजीनामा, सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर निर्णय

25 मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी तिच्या दोन मैत्रिणीसह पीडितेच्या वर्सोवा येथील घरी पोहोचली. आरोपीने बेल वाजवल्यानंतर पीडितेने आईस्क्रीमची डिलिव्हरी आली असावी, असे वाटल्याने दरवाजा उघडला. त्याच क्षणी आरोपीने पीडितेला बाहेर ओढत कात्रीने तिचे केस कापण्यास सुरूवात केली. यावेळी आरोपीसोबत असलेल्या मैत्रिणीने आपल्या मोबाईलवर संपूर्ण घटना रेकॉर्ड केली. आणि त्यानंतर आरोपीने हेअर नो हेअर असे म्हणत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एव्हढंच नाहीतर पीडितेने आरडाओरडा केला असताना आरोपी काही केस सोबत घेऊन तिथून पसार झाली. त्यानंतर पीडितेनं थेट पोलीस ठाणं गाठलं आणि आरोपीला सायको म्हणत तक्रार केली...कुणाला माझे केस आवडले तर मी काय करु शकते? असा सवाल पीडितेनं केलाय...

Mumbai woman
सैतान बापानं मुलीला लटकवलं, चोरीच्या संशयातून जन्मदात्याचं सैतानी कृत्य, सांगलीत काळीमा फासणारी घटना

खरं तर पीडितेची ओळख काही काळापूर्वीच आरोपी आणि आरोपीच्या प्रियकराशी झाली होती. इंस्टाग्रामच्या माध्यमातून पीडिता आणि आरोपीचा प्रियकर एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, प्रियकर आणि पीडिता यांच्यात संबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलंय. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय.

प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं असं जरी म्हटलं जात असलं तरी. ही घटना पाहिल्यानंतर सगळ्यांचेच प्रेम सेम नसतं.. हेच खरं

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

Mumbai woman
Maharashtra Politics : संजय राऊत ठाकरेंची शिवसेना सोडणार? भाजपच्या दाव्यानं राज्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com