मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर बस आणि कारलाच प्रवेश; कोणत्या वाहनांना असणार बंदी? महत्त्वाची माहिती समोर

Mumbai pune missing link update : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर बस आणि कारलाच प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तर काही वाहनांना बंदी असण्याची शक्यता आहे.
Mumbai pune missing link news
Mumbai pune missing link update Saam tv
Published On
Summary

'मिसिंग लिंक'बाबत महत्त्वाची समोर

मिसिंग लिंकवर केवळ बस आणि कार अशा वाहनांना प्रवेश

वाहतूक विभाग लवकरच काढणार परिपत्रक

पुणे-मुंबई महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या 'मिसिंग लिंक'बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या मिसिंग लिंकवर फक्त बस आणि कार अशा वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे निश्चित झालं आहे. वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडून लवकरच परिपत्रक काढण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर १३.३ किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 'एमएसआरडीसी', अतिरिक्त पोलीस महासंचालक, परिवहन आणि सेव्ह लाइफच्या फाऊंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिसिंग लिंकची प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच वाहतूक व्यवस्थापनाच्या योजनाचा आढावा घेण्यात आला.

Mumbai pune missing link news
Kuwait attack news: मोठी बातमी! कुवैतमधील वीज प्रकल्प उद्ध्वस्त, भारतीय कामगाराचा मृत्यू

एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीत कार आणि बसचे प्रमाण सुमारे ७० टक्के तर ३० टक्के अवजड वाहनांचा समावेश आहे. मिसिंग लिंकवरून पहिल्या टप्प्यातील सहा महिने कार आणि बसची वाहतूक चालणार आहे. याबाबत पुणे महामार्ग पोलिसातील वरिष्ठांनी दुजोरा दिला आहे. तर या लिंकवर पावसाळ्यानंतर काही प्रमाणात मालवाहू वाहनांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. पुढील काळात वाहतुकीचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येणार आहे.

घाटात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागतं. एक्स्प्रेसवर अवजड वाहनांमुळे भीषण अपघात घडतात. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर बोरघाटातील वाहतुकीवरील ताण जवळपास ७० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हजारो वाहनचालकांना घाट दिलासा मिळू शकतो.

Mumbai pune missing link news
कल्याण हादरलं! भाड्याच्या घरातून ५ कोटींचे ड्रग्स जप्त, मास्टरमाइंड महिलेला बेड्या

काही दिवसांपूर्वी एक्स्प्रेसच्या बोगद्याजवळ केमिकलचा कंटेनर उलटला. यामुळे अनेक तास एक्स्प्रेसवरील वाहतूक ठप्प झाली होती. या मिसिंग लिंकचे दोन बोगदे होते. आशियातील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा आहे . हा बोगदा ८.९२ किलोमीटर लांबीचा आहे. या मिसिंग लिंकमधून केमिकल टँकरच्या वाहतुकीला कायमची बंदी असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com