Kuwait attack news: मोठी बातमी! कुवैतमधील वीज प्रकल्प उद्ध्वस्त, भारतीय कामगाराचा मृत्यू

Indian worker death Kuwait: कुवैतमधील वीज प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे.
Kuwait attack news
Kuwait attack newssaam tv
Published On

आजच्या घडामोडींमध्ये आखाती प्रदेशात तणाव अधिकच वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच कुवैतमधील वीज प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.

कुवैतच्या वीज आणि पाणी निर्लवणीकरण मंत्रालयाच्या माहितीनुसार, इराणकडून झालेल्या हल्ल्यात या प्रोजेक्टमधील सर्विस इमारतीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्या फातिमा अब्बास जवाहर हयात यांनी ही माहिती दिली.

दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय. रविवारी तेहरान आणि आसपासच्या भागांमध्ये हवाई हल्ल्यांमुळे वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला होता. इराणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिकेवर भूमीवरील हल्ल्याची तयारी सुरू असल्याचा आरोप केला आहे.

पाकिस्तानची भूमिका काय?

या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या महिनाभराच्या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी 'अर्थपूर्ण चर्चा' आयोजित करण्याची तयारी पाकिस्तानने दर्शवलीये.

दरम्यान इस्रायलमध्ये 2026 च्या अर्थसंकल्पावर मतदान होणार असून त्यात संरक्षण खर्चामध्ये मोठी वाढ आहे. हा खर्च 10 अब्ज डॉलरने वाढवून एकूण 45 अब्ज डॉलरच्या पुढे नेण्याचा प्रस्ताव कऱण्यात आला आहे. फेब्रुवारी 28 पासून अमेरिका आणि इस्रायलसोबत इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षात इस्रायलची कारवाई सुरूच आहे.

Kuwait attack news
Gas Cylinder: गुड न्यूज! ३०० रुपयांनी स्वस्त मिळतोय गॅस सिलिंडर, कुठे अन् कसा मिळवायचा?

उर्जा मंत्रालयाची माहिती

इराणच्या ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेहरान आणि आसपासचे भाग तसंच अल्बोर्ज प्रांतात वीजपुरवठा खंडित झालाय. हे हल्ले वीज संरचनेवर झाल्यामुळेपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इशारा दिला होता की, जर इराणने शांतता करार मान्य केला नाही तर त्यांच्या वीज प्रकल्पांवर हल्ले केले जाऊ शकतात. चर्चेच्या मुदती वारंवार वाढवल्या जात असतानाच हा इशारा देण्यात आला होता.

Kuwait attack news
Yavatmal Crime: शेजाऱ्याच्या घरातील पोत्यात आढळला बेपत्ता ७ वर्षीय मुलीचा मृतदेह |Video

दुसरीकडे इराणच्या संसदाध्यक्ष मोहम्मद बाकर घालिबाफ यांनी अमेरिकेला इशारा दिलाय की, कोणताही भूमीवरील हल्ला झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल. अमेरिकेचं एक युद्धपोत 3,500 अतिरिक्त सैनिकांसह या भागात दाखल झाल्यानंतर त्यांनी हा इशारा दिलाय.

Kuwait attack news
Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

घालिबाफ यांनी पुढे सांगितलं की, 'शत्रू एकीकडे चर्चेची भाषा करतोय तर दुसरीकडे गुपचूप हल्ल्याची तयारीही करतोय. अमेरिकन सैनिक जमिनीवर उतरल्यास त्यांना कडाडून प्रत्युत्तर दिलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com