Western Railway News : रेल्वे रूळ ओलांडल्यास हात होणार 'काळे', पश्चिम रेल्वेची काय आहे नवी उपाययोजना; वाचा

Western Railway Local News : मुंबई लोकलमधील रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने कुंपणांवर वंगण लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा उपाय आहे.
Western Railway News : रेल्वे रूळ ओलांडल्यास हात होणार 'काळे', पश्चिम रेल्वेची काय आहे नवी योजना; वाचा
Western Railway Local NewsSaam Tv
Published On
Summary
  • रूळ ओलांडण्यामुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेचा निर्णय

  • चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान कुंपणांवर वंगण लावण्याचे काम

  • सीसीटीव्ही, दंडात्मक मोहीम आणि जनजागृतीवर भर

मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवास करताना अनेक प्रवासी रेल्वेचे नियम तोडून प्रवास करतात. काहीजण तिकीट काढत नाहीत, लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवासी करतात, तर काहीजण घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन रुळांमध्ये बसविलेल्या लोखंडी कुंपणावर वंगण लावण्यास सुरुवात केली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गिकेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्यावेळी थेट रूळ ओलांडण्याचा मार्ग निवडतात. अशा प्रकारे ट्रेन बदलताना अचानक समोरून दुसरी लोकल आल्यास गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. प्रवाशांच्या निष्काळजीमुळे होणारे ट्रेसपासिंग व अपघात कमी करण्याच्या उद्देशाने चर्चगेट ते विरार दरम्यानच्या स्थानकांमधील लोखंडी कुंपणावर वंगण (तेल) लावण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे.

Western Railway News : रेल्वे रूळ ओलांडल्यास हात होणार 'काळे', पश्चिम रेल्वेची काय आहे नवी योजना; वाचा
Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरलेल्या प्रवाशांना भरधाव कंटेनरने चिरडलं; ६ जणांचा मृत्यू, १ जखमी

येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय सीसीटीव्ही देखरेख, विशेष दंडात्मक मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम राबवले जात असून प्रवाशांनी सुक्षिततेसाठी रूळ ओलांडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Western Railway News : रेल्वे रूळ ओलांडल्यास हात होणार 'काळे', पश्चिम रेल्वेची काय आहे नवी योजना; वाचा
Kalyan : ठाकरे गटाचे ‘बेपत्ता’ नगरसेवक शिंदेंसेनेच्या मंचावर, कुठे होते? विचारताच काढला पळ, कल्याणच्या राजकारणात नेमकं काय घडतेय?

प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उपनगरी मार्गावर १४७ फूट ओव्हरब्रिज, तसेच ११० एस्कलेटर आणि ५४ लिफ्ट उभारण्यात आल्या आहेत. तरीदेखील काही प्रवासी या सुविधांकडे दुर्लक्ष करून घाईघाईत कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक अपघात घडतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com