मुंबईत मोठी कारवाई; ५०० हून अधिक घरांवर बुलडोझर फिरवला, घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त

mumbai bandra news : मुंबईच्या वांद्रे भागात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ५०० हून अधिक घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.
mumbai bandra
mumbai bandra newsSaam tv
Published On
Summary

मुंबईच्या वांद्रे भागात रेल्वेकडून मोठी कारवाई

रेल्वेने ५०० हून अधिक अनधिकृत बांधकामावर कारवाई

बुलडोझरने अनधिकृत घरे हटवली

Mumbai Bandra Demolition Drive: मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील गरीब नगरमध्ये मंगळवार सकाळपासून अतिक्रमणविरोधी मोहीम कारवाई सुरू आहे. ही कारवाई पश्चिम रेल्वेकडून केली जात आहे. या कारवाईअंतर्गत ५०० हून अधिक घरे पाडण्यात आली आहेत. सकाळी १० वाजल्यापासून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले होते.

कारवाई सुरू होण्यापूर्वीच बहुतांश रहिवाशांनी घरे रिकामी केली. अनेक कुटुंबांनी घरातील साहित्य रस्त्यावर आणून ठेवलं. त्यानंतर दोन बुलडोझरने बेकायदेशीर घरांचं बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांची कायदेशीर प्रक्रिया आणि कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

mumbai bandra
Virar : विरारकरांचा प्रवास सुसाट होणार! बहुप्रतीक्षित नारंगी ब्रिज प्रवाशांसाठी खुला

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक जागा कायद्याअंतर्गत २०१७ सालापासून कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर २७ नोव्हेंबर २०१७ रोजी घर रिकामी करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. परंतु प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कारवाईला उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनानुसार, वांद्रे भागातील हे प्रकरण जवळपास नऊ वर्षे कोर्टात सुरे होते. या प्रकरणात मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही सुनावणी झाली. त्यानंतर २९ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशाअंतर्गत मुंबई हायकोर्टाने रेल्वेला बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची परवानगी दिली. परंतु या आदेशाला आव्हान देण्यात आलं होतं, परंतु हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने रेल्वेच्या कारवाईचा आदेश कायम ठेवला.

सर्वेक्षणादरम्यान अतिक्रमण म्हणून नोंद झालेल्या बांधकामांना पाडण्यात येत आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

mumbai bandra
Mumbai Goa Expressway: कोकणकरांना दिलासा! मुंबई गोवा एक्सप्रेस वेबाबत अपडेट; पावसाळ्याआधी परशुराम घाटातील दुसरी लेन सुरू

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, गरीब नगर हा परिसर रेल्वे रुळांच्या अगदी जवळ आहे. बेकायदेशीर वस्त्यांमुळे प्रवासी आणि रेल्वे वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. सुरक्षेच्या कारणात्सव आणि भविष्य पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी हा मोकळा करणे आवश्यक असल्याचे रेल्वेने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com