Mumbai Goa Expressway: कोकणकरांना दिलासा! मुंबई गोवा एक्सप्रेस वेबाबत अपडेट; पावसाळ्याआधी परशुराम घाटातील दुसरी लेन सुरू

Mumbai Goa Expressway Work Update: मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान, आता परशुराम घाटातील डोंगरकटाई, रॉक बोल्टिंग, रिटेनिंग वॉल आणि गॅबियन वॉलचे काम शेवटच्या टप्प्यात आहे.
Mumbai Goa Expressway
Mumbai Goa ExpresswaySaam Tv
Published On
Summary

मुंबई गोवा महामार्गावर कामाला वेग

परशुराम घाटात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक कामे पूर्ण

परशराम घाटातील दुसरी लेनदेखील सुरु

सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेकजण कोकणात जात आहे. आता मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.परशुराम घाटातून प्रवास आता सुखकर होणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेले डोंगरकटाई, रॉक बोल्टिंग, रिटेनिंग वॉल आणि गॅबियन वॉलचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. घाटातील दुसरी लेनही वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहतुक कोंडी होत नाहीये. प्रवाशांना आरामात महामार्गावरुन प्रवास करता येत आहे.

Mumbai Goa Expressway
Vande Bharat sleeper : मुंबई-पुणे-बंगळुरू वंदे भारतचा मार्ग ठरला, तिकिटाच्या किंमतीही समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

परशुराम घाटातील प्रवास सुरक्षित होणार (Parshuram Ghat Work)

परशुराम घाट हा मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील घाट मानला जातो. पावसाळ्यात दरडी कोसळणे, दगड-माती रस्त्यावर येणे तसेच गॅबन वॉल वाहून जाण्याच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. त्यामुळे काही वेळा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती.मात्र, आता सुमारे 80 ते 85 टक्के काम पूर्ण झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घाटामध्ये करण्यात आलेल्या रॉक बोल्टिंगमुळे डोंगराचा भाग अधिक मजबूत करण्यात आला असून रिटेनिंग वॉलमुळे माती आणि दगड रस्त्यावर येण्याचा धोका कमी होणार आहे.

Mumbai Goa Expressway
Vidarbha Expressway : मोठी बातमी! विदर्भात ४ महामार्ग होणार, कुठून कोणता एक्सप्रेस वे जाणार? वाचा A टू Z माहिती

परशुराम घाटातील दुसरी लेन सुरु (Parshuram Ghat Work Update)

विशेष म्हणजे घाटातील दुसरी लेन सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून उर्वरित कामही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळेच कोकण, गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

Mumbai Goa Expressway
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com