Mumbai : मुंबईत वाहतुकीत मोठे बदल; १३ ते २० सप्टेंबरदरम्यान प्रमुख मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Traffic Alert : माउंट मेरी यात्रेनिमित्त १३ ते २० सप्टेंबरदरम्यान वांद्रे परिसरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जाणून घ्या रस्ते बंद, वन-वे, अवजड वाहनबंदी आणि नो-पार्किंगची संपूर्ण माहिती.
Mumbai Traffic Update News
Mumbai Traffic Update News Ai image
Published On
Summary
  • मुंबईत वाहतुकीत मोठा बदल

  • १३ ते २० सप्टेंबरदरम्यान माउंट मेरी यात्रेमुळे वाहतुकीत बदल

  • महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीत बदल

  • अवजड वाहनांना अनेक प्रमुख रस्त्यांवर प्रवेशबंदी

मुंबईकरांनो १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत वांद्रे परिसरात प्रवास करत असाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी. माउंट मेरी यात्रेनिमित्त यंदा १३ ते २० सप्टेंबरदरम्यान मोठ्या संख्येने भाविक माउंट मेरी चर्चला भेट देण्याची शक्यता आहे. यात्रेच्या काळात माउंट मेरी परिसरासह वांद्रे वाहतूक विभागातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून विविध वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात्रेच्या कालावधीत माउंट मेरी रोड सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत स्थानिक रहिवाशांची वाहने, पोलीस वाहने आणि आपत्कालीन सेवांची वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. केन रोडवरही वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. माउंट मेरी रोडपासून पुढे बी. जे. रोडपर्यंत स्थानिक पासधारक रहिवाशांची वाहने आणि आपत्कालीन वाहने वगळता इतर वाहनांसाठी हा वनवे असेल. त्यामुळे बी. जे. रोडकडून केन रोडवर प्रवेश करता येणार नाही. त्याचप्रमाणे परेरा रोड पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी वनवे करण्यात आला असून, बी. जे. रोडकडून या मार्गावर प्रवेश बंद असेल. सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड स्थानिक रहिवाशांची वाहने आणि आपत्कालीन वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Mumbai Traffic Update News
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

अवजड वाहनांना प्रवेशबंदी

यात्रेच्या काळात सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. यामध्ये के. सी. मार्ग, बॅपेल रोड, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, माउंट कार्मेल रोड, माउंट मेरी रोड, बी. जे. रोड आणि केन रोड यांचा समावेश आहे.

Mumbai Traffic Update News
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

'या' मार्गांवर 'नो पार्किंग'

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी माउंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोडवरील सेंट पॉल रोड ते मेहबूब सर्कल परिसर, माउंट कार्मेल रोड, बॅपेल रोड, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, रिबेलो रोड आणि डॉ. पीटर डायस रोड येथे नो-पार्किंग लागू करण्यात आले आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा तसेच वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com