Mumbai Traffic : मुंबईत १ मे रोजी 'या' ठिकाणी वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Dadar Traffic Update : महाराष्ट्र दिनानिमित्त दादर आणि शिवाजी पार्क परिसरात वाहतुकीत मोठे बदल लागू. सकाळी ६ ते दुपारी १२ दरम्यान रस्ते बंद राहणार. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन.
Mumbai Traffic : मुंबईत १ मे रोजी 'या' ठिकाणी वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
MUMBAI TRAFFIC ALERT: DADAR ROAD CLOSURES FOR MAHARASHTRA DAY PARADESaam Tv
Published On
Summary
  • १ मे रोजी दादरमध्ये वाहतूक बदल लागू

  • सकाळी ६ ते दुपारी १२ दरम्यान निर्बंध

  • शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिन परेड

  • पर्यायी मार्ग आणि पार्किंगचा वापर करण्याचा सल्ला

  • नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन

Mumbai Dadar Shivaji Park 1st May Maharashtra Din Parade वाहनधारकांनो येत्या १ मे रोजी मुंबई शहरातील गजबजलेल्या दादर परिसरात फिरणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. महाराष्ट्र दिनानिमित्त दादर परिसरात आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य परेडमुळे मुंबई पोलिसांनी वाहनचालकांसाठी विशेष वाहतूक सूचना जारी केली आहे. १ मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनाची परेड पार पडणार असून, सकाळी ६ ते दुपारी १२ या कालावधीत दादर आणि आसपासच्या भागातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीत बदल व निर्बंध लागू राहणार आहेत.

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेड सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी ही विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत दादर, शिवाजी पार्क आणि लगतच्या प्रमुख मार्गांवर वाहनांची ये-जा मर्यादित राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या वेळेत या भागात प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Traffic : मुंबईत १ मे रोजी 'या' ठिकाणी वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

वाहनचालकांना विशेषतः सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत दादर आणि शिवाजी पार्क परिसर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, आवश्यक असल्यास कोहिनूर बीएमसीच्या वाहनतळातच पार्किंग करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. स्थानिक रहिवासी आणि इतर नागरिकांनी जे. के. सावंत रोडवरील प्लाझा सिनेमाजवळील बीएमसीच्या कोहिनूर पार्किंग लॉटचा वापर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai Traffic : मुंबईत १ मे रोजी 'या' ठिकाणी वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Mumbai : MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार

दरम्यान, नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विविध ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात असतील. बदललेल्या रस्त्यांची दिशा दाखवण्यासाठी तसेच वाहन धारकांच्या माहितीसाठी सूचना फलकाचा वापर करण्यात येणार आहे. मिरवणुकीचा मार्गही पोलिसांनी जाहीर केला आहे. परेडची सुरुवात शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक ५ पासून होईल. तेथून केळुस्कर रोड (उत्तर), सी. रामचंद्र चौक, एस. सावरकर रोड (दक्षिण), वसंत देसाई चौक मार्गे मिरवणूक पुढे जाईल आणि नारळी बाग येथे संपेल. महाराष्ट्र दिनाचा सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा, यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com