
दहावी पास झालेल्या विद्यार्थी आता अकरावीच्या अॅडमिशनसाठी अर्ज करत आहेत. अकरावीचे अॅडमिशन घेण्यासाठी चांगले कॉलेज खूप महत्त्वाचे असते. जर तुमचे कॉलेज चांगले असेल तर तुमच्या कलागुणांना वाव मिळतो आणि तुम्हाला भविष्यात करिअरच्या अफाट संधी उपलब्ध होती. तुम्ही ठाण्यातील कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला ठाण्यातील टॉप १० कॉलेजची नावे सांगणार आहोत.
1. के. जी जोशी अँड एन.जी बेडेकर कॉलेज (K.G Joshi And N.G Bedekar College)
जोशी-बेडेकर कॉलेज हे खूप प्रसिद्ध आहे. ठाण्यातील या कॉलेजमध्ये कट ऑफदेखील जास्त असते. या कॉलेजमध्ये तुम्हाला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
2. सतिश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज (Satish Pradhan Dnyansadhana College)
ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजदेखील खूप प्रसिद्ध आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला अनेक कॉर्सेस उपलब्ध होतील. हे कोर्स घेऊन तुम्हाला करिअरमध्ये काय करायचे हे समजेल.
3. ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (Thakur College)
ठाण्यातील ठाकूर कॉलेज हे खूप चांगले कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये अभ्यासाशिवाय इतर अनेक उपक्रम होतात. ज्यामध्ये तुम्हाला चांगलं काम करायची संधी मिळेल.
4. केईएस श्रॉफ कॉलेज (KES College)
केईएस श्रॉफ कॉवेज १९८९ मध्ये बांधण्यात आले होते. या कॉलेजमध्ये तुम्हाला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि मॅनेजमेंट स्टडीचा अभ्यास करता येईल.
5. के.पी.बी हिंदुजा कॉलेज (K.P.B Hinduja College)
के.पी.बी हिंदुजा कॉलेजमध्ये तुम्हाला विविध शाखांचे पर्याय उपलब्ध होतील. तुम्हाला अंडरग्रॅज्युएट कोर्सेदेखील करता येईल. बी.कॉम, BAF,BBI या कोर्ससाठी अॅडमिशन घेता येईल.
6. शेठ एन.केटी.टी कॉलेज ऑफ कॉमर्स (Sheth N.KT.T College Of Commerce)
या कॉलेजमध्ये कॉमर्ससाठी अनेक संधी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना फायनान्स आणि कॉमर्स फील्डमध्ये करिअर करायचे आहे. त्यांनी या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यावे. या श्रेत्रात तुम्हाला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
7. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स (Mulund College of Commerce)
ठाण्याजवळच असलेलं मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स खूप प्रसिद्ध आहे. मुलुंड कॉलेजमध्ये तुम्हाला कॉमर्समध्ये करिअरची सुविधा मिळणार आहे. कॉमर्स, बँकिंगा क्षेत्रात काम करायचे असेल तर तुम्ही या कॉलेजमध्ये नक्की अॅडमिशन घ्या.
8. व्ही. जी. वझे कॉलेज (V.G Vaze College)
वझे कॉलेजला केळकर कॉलेज (Kelkar College) म्हणूनदेखील ओळखले जाते. वझे केळकर कॉलेज त्यांच्या अभ्यासासोबतच फेस्टिव्हलसाठी जास्त ओळखले जाते. या कॉलेजमध्ये तुम्हाला करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायची संधी मिळते.
9. रामानंद आर्य डी ए व्ही कॉलेज (DAV College)
भांडूपमधील डी ए व्ही कॉलेजमध्येही विद्यार्थी अॅडमिशन घेऊ शकताच. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेत करिअर करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या कॉलेजमध्ये इतर अनेक उपक्रम होतात.
10. आर.जे कॉलेज (R. J College, Ghatkopar)
घाटकोपरमधील आर. जे कॉलेजमध्ये शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या कॉलेजमध्ये ११वी,१२ वीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत अनेक कोर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला एकाच कॉलेजमध्ये अनेक कोर्स मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.